माय महाराष्ट्र न्यूज:मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण व्हायरल झाल्याने श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक लक्ष्मण दशरथ वैरागळ आणि कॉन्स्टेबल योगेश शिवाजी राऊत यांना विभागीय चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी रविवारी (ता. ३०) निलंबनाचा आदेश काढला आहे.श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांमधील मोबाईलवरील संभाषण व्हायरल झाले आहे.
पोलिस खात्याची बदनामी करणारे हे संभाषण आहे. पोलिसांची समाजातील प्रतिमा मलिन झाली आहे. हे वर्तन बेशिस्त आणि निष्काळजीपणाचे असल्याचा अहवाल श्रीरामपूर विभागाचे
पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या संभाषणाच्या अनुषंगाने शनिवारी (ता. २९) जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना पाठविला होता.अवैध धंदे वाल्यांकडून हप्ते वसुली संदर्भातील ही ऑडिओ
क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.त्यामुळे दोषींचे निलंबन करीत प्रकरणाची गंभीर दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे.