Friday, July 1, 2022

जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर

जिल्हा नियोजन समिती अहमदनगर या समितीवर नामनिर्देशित तसेच विशेष निमंत्रित असा 20 सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

“महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) (सुधारणा) अधिनियम, क्रमांक ३०/२००० मधील कलम ३ चा पोटकलम (३) (दोन) (ब) व ३(३) दोन (क) नुसार व पोटकलम (३) मधील (चार) (फ) येथील तरतूदीनुसार सोबत जोडलेल्या विवरणपत्र “अ” मध्ये दर्शविलेल्या विधीमंडळ / संसद सदस्यांमधून नामनिर्देशनाच्या दोन सदस्यांची, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या चार व्यक्तिची नामनिर्देशित सदस्य म्हणून तसेच जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या व सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या १४ व्यक्तिची “विशेष निमंत्रित” म्हणून अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

यामध्ये संसद व विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित सदस्य खा. सदाशिव किसन लोखंडे, श्रीरामपूरचे आ.लहू नाथा कानडे यांची नियुक्ती केली आहे.

तर जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य म्हणुन प्रभाकर रेवणनाथ गाडे ( रा. बारागाव नांदुर), अविनाश गोविंदराव आदिक (रा. श्रीरामपूर), बाबासाहेब दिघे (रा. श्रीरामपूर), हर्षवर्धन अशोक बोठे (रा. वाळकी) यांची नियुक्ती केली आहे.

तर विशेष निमंत्रित सदस्यामध्ये शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितीज घुले पाटील (रा. शेवगाव), ऋषिकेश प्रताप ढाकणे (रा. पाथर्डी), बाबासाहेब भिमाजी तरटे (रा. भाळवणी), पोपटराव गणुजी दराडे (रा. समशेरपूर), सोनाली राहुल रोहमारे (रा. कोपरगाव), प्रवीण विठ्ठल घुले (रा. कर्जत), बी. आर. चकोर (रा. संगमनेर),मधुकर नवले (रा. अकोले), जयंत रामनाथ वाघ (रा. अहमदनगर), विशाल राजेंद्र झावरे (रा. कोपरगाव), संजय नारायण काशीद (रा. जामखेड), शरद मधुकर झोडगे (रा. नागरदेवळे), भागवत बाळासाहेब मुंगसे (रा. देवळाली प्रवरा ), अभिजीत भगवान खोसे (रा. बुरुडगाव रोड, अहमदनगर ) यांना समितीमध्ये स्थान मिळाले आहे.

 

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!