माय महाराष्ट्र न्यूज:व्हेलेंटाईन वीकमध्ये येणारा सातवा दिवस म्हणजे किस डे 13 फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो. यादिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना किस करतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात.
किस डेच्या दिवशी किस केल्यामुळे प्रेम वाढते. पण चुंबन घेणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते हे तुम्हाला माहिती आहे का?
किस करताना शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी होते. त्यामुळे व्यक्तीला तणावमुक्त झाल्यासारखे वाटते. किससोबतच मिठी मारणे किंवा मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणणे, यासारखे भावनिक संवाद देखील आपल्या मनोवैज्ञानिक प्रक्रियेसाठी चांगले मानले जाते.
एका प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका आंद्रिया डिमिर्झिओन म्हणतात की, ‘किस आपल्या हृदयाचे ठोके वाढवून रक्तवाहिन्या विस्तृत करते. रक्तवाहिन्यांच्या विस्तारामुळे रक्त प्रवाह वाढतो आणि रक्तदाब लगेच कमी होतो.
रक्तवाहिन्या विस्तारून आणि रक्त प्रवाह वाढल्याने शारीरिक त्रासही दूर होतो. रक्तवाहिन्यांच्या विस्तारामुळे रक्तदाब कमी झाल्यास डोके दुखीसारख्या समस्याही दूर होतात, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
एका रिपोर्टनुसार, रोमँटिक किसिंगचा अनुभव शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीशी देखील संबंधित आहे. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राखता येते. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोकाही कमी होऊ शकतो.
किस घेताना आपल्या शरीरातील कॅलरीज लवकर बर्न होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका मिनिटाच्या किसने 2 ते 26 कॅलरीज कमी होऊ शकतात. किसिंगमुळे अतिरिक्त कॅलरीज कमी होतात.