Saturday, July 2, 2022

10 वी- 12 वीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली अत्यंत महत्त्वाची बातमी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. यंदा परीक्षा ऑफलाईन होणार आहेत.

विद्यार्थी देखील झपाटून अभ्यास करत आहेत. अशातच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयात परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत संकेत दिले आहेत.राज्यात गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांचे

ऑनलाईन क्लास झाले. काही ठिकाणी ऑफलाईन वर्ग देखील सुरू करण्यात आले होते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेबाबत भीती निर्माण झाली आहे. वार्षिक परीक्षेला सामोरे जाताना निर्माण होणारा

ताण-तणावासाठी मार्गदर्शन आणि समुदेशन करण्यासाठी @scertmaha तर्फे प्रशिक्षित मार्गदर्शक आणि समुपदेशकांची सल्ला, मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्गदर्शक आणि समुपदेशकांची यादी https://maa.ac.in/index.php?

tcf=counselors_list या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देखील शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत.दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकीट उपलब्ध करून दिले आहेत.

बोर्डाची अधिकृत वेबसाईट www.mahahssboard.in वरून विद्यार्थ्यांना हॉल टिकीट डाऊनलोड करता येईल. तसेच शाळा आणि महाविद्यालयातून ऑनलाईन हॉल तिकीटची प्रिंट मिळणार आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!