Monday, December 6, 2021

राज्यावर कोरोनाचं मोठं संकट -ना. बाळासाहेब थोरात ,;नगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आढावा बैठक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : कोरोनाचे संकट मोठे आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन संघर्ष करण्याचे आवाहन थोरात यांनी केले. सुरूवातीस एकूण रूग्णसंख्येच्या 60 टक्के रूग्ण राज्यात होते. आज आपण 30 टक्क्यांपर्यंत खाली आलो आहोत.

इतर राज्यात मात्र रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जुन्या पिढीनेही साथीचे रोग पाहिले आहेत. त्याकाळातही लोक विलगीकरणात राहत होते.

गावातून वाड्या वस्त्यांवर वास्तव्य करीत होते. विलगीकरण आपणास नवे नाही. विलगीकरण कटाक्षाने पाळले गेले पाहिजे असं आवाहन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

पारनेर मधील गणेश मंगल कार्यालयात बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक पार पडली.याप्रसंगी ते बोलत होते. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचा मुंबई, पुण्याशी मोठा संपर्क असल्याने तेथून गावी आलेल्या पाहुण्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवण्याच्या सुचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.

पारनेर तालुक्यात अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्या समन्वयातून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवित असल्याचे सांगतनाच आमदार नीलेश लंके तसेच अधिकार्‍यांच्या कामाचेही थोरात यांनी कौतुक केले.थोरात यांनी तालुका प्रशासनाचे कौतुक करताना लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी करण्यात आल्याचे सांगितले.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये इतर भागामध्ये चांगला अनुभव नाही. तेथील लोक गांभीर्याने घेत नाहीत. पारनेर तालुक्यात मात्र कोठेही लोक फिरताना दिसत नाहीत. दुकानेही बंद आहेत. येत्या 30 तारखेपर्यंत अशीच शिस्त पाळली तर पारनेर तालुक्याचा आकडा सर्वात कमी असेल असा

विश्वास यांनी व्यक्त केला. मध्यंतरी रूग्णसंख्या कमी झाल्याने रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादन मर्यादीत करण्यात येत होते. मागणी वाढल्यानंतर उत्पादन वाढविण्यात आले असले तरी उत्पादनानंतर 15 दिवसानंतर इंजेक्शनचा वापर करता येतो. पंधारा दिवसांचा कालावधी येत्या दोन तिन दिवसांत संपणार असून त्यानंतर मात्र रेमडेसिवरचा पुरवठा मुबलक होईल

असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आमदार नीलेश लंके, आमदार डॉ. सुधिर तांबे, जि. प. च्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, संभाजी रोहोकले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

ताज्या बातम्या

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यानंतर शाळाबाबत शिक्षणमंत्री यांचं महत्त्वाचं विधान…

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सद्यस्थितीत ओमायक्रॉन...

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...

अत्यंत धक्कादायक बातमी! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये...

पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल;तर रद्द होईल घर

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला मिळालेलेल...

पीएम किसान पुढील हप्ता लवकर:यादीत तुमचे नाव आहे का ? असं चेक करा

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. सरकारने 10 वा हप्ता...
error: Content is protected !!