Friday, July 1, 2022

सावधान! आता आला ‘लासा’ फिवरचं नवं संकट! जाणून घ्या काय आहेत लक्षणे

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नव्या विषाणूने जगाची चिंता वाढवली आहे. ‘लासा’ असे या नवीन विषाणूचे नाव असून ब्रिटनमध्ये या विषाणूने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या विषाणूची लागण झालेले तीन रुग्ण आढळून आले आहे.

यातील एकाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. हा विषाणू आफ्रिकन देशाव्यतिरिक्त कुठेही पोहोचला नसला तरी ब्रिटनमधील केसनंतर चिंता वाढली आहे.

या प्रकारात मृत्यूचे प्रमाण जास्त नसले तरी 80 टक्के प्रकरणांमध्ये कोणतेही लक्षण दिसून येत नाही. युरोपियन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या मते या, आजारावर

आतापर्यंत कोणताही इलाज मिळालेला नाही. काही रुग्णांनाची प्रकृती गुंतागुंतीची होत त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. यातील 15 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. गर्भवती स्त्रियांना या आजाराचा सर्वाधिक धोका आहे.

लासा विषाणूची लागण झाल्यानंतर 1 ते 3 आठवड्यांनी रुग्णाला सौम्य लक्षणे दिसतात. यता सुरुवातीला ताप येतो, त्यानंतर थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी ही लक्षणे दिसतात. यासह रुग्णाला

 श्वास घेण्यास त्रास होणे, चेहऱ्यावर सूज येणे, कंबर, छाती आणि पोटात दुखायला लागते. लक्षणं तीव्र झाल्यानंतर योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. यासह काहींचे अवयव निकामी होऊ शकतात.

हा आजार सर्वात प्रथम 1969 साली पश्चिम आफ्रिकेच्या नायजेरियातील ‘लासा’ येथे आढळला. तेव्हा दोन नर्सचा मृत्यू झाल्यानंतर याची दाखल घेण्यात आली होती. हा आजार उंदरांमुळे पसरतो.

तो पहिल्यांदा नायजेरिया, गिनिया, सियरा, लियोन, लायबेरिया येथे महामारी म्हणून घोषित झाला होता. उंदराची लघवी, विष्ठामुळे किंवा त्यांनी दूषित केलेल्या खाद्य पदार्थामुळे लासाची लागण होण्याची शक्यता वाढते. या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्यांना देखील संसर्ग होत.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!