Friday, July 1, 2022

नगर ब्रेकिंग:कारचा भीषण अपघात ;अपघातात दोन शिक्षिकांचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारातील बायपासजवळ कारच्या अपघातात दोन शिक्षिकांचा मृत्यू झाला.

यात एक शिक्षिका महिला जागीच ठार झाली, तर दुसरी शिक्षिका महिला गंभीर जखमी झाली होती, जखमी झालेल्या शिक्षिकेला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पण दीड तासाने तिचाही मृत्यू झाला.

ही घटना बुधवारी (ता. १६) फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.सुनीता रामदास माकोडे व नंदा रामनाथ पारधी या दोघी बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान बोटा बायपासजवळ शतपावली करत होत्या.

नाशिक – पुणे महामार्गाने संगमनेरकडून आळेफाट्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (एमएच -१४, इ वाय ७८७३ ) कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार महामार्गाच्या उपरस्त्याकडे जात जोराची धडक दिली. त्यामुळे झालेल्या

अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून दुसरी महिला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील,

किशोर लाड यांनी घटनास्थळी धाव घेत या अपघाताचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी संगमनेर येथील कुटिर रुग्णालयात दाखल केले.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!