माय महाराष्ट्र न्यूज:देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेडने फेब्रुवारीमध्ये या वस्तूंच्या दरात 3 ते 10 टक्क्यांची वाढ केली आहे.कंपनीने दोन महिन्यात सलग दुसऱ्यांदा दरवाढ केली आहे.
HUL ने दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम कमी करण्यासाठी या वस्तूंवरील दर पुन्हा दुसऱ्यांदा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबर तिमाहीनंतर व्यवस्थापनाने
ही वाढ सुसंगत किमतीतील वाढ असल्याचं सांगितलं आहे.कच्च्या मालाचे दर डिसेंबर तिमाहीपेक्षा अधिक असल्यास टप्प्याटप्प्याने किमती वाढवण्याचा विचार केला जाईल अशी शक्यता कंपनीने
डिसेंबरमध्ये व्यक्त केली होती. हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेडचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) रितेश तिमारी यांनी सांगितलं, की वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर आमचं पहिलं प्राधान्य बचतीला असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने किमती वाढवण्याला आहे.
ब्रोकरेज फर्म एडलवीज सिक्योरिटीजने सांगितलं, की एफएमसीजी कंपनीने फेब्रुवारीमध्ये साबण, सर्फ, डिशवॉश सारख्या उत्पादनांच्या किमतीत 3 ते 10 टक्क्यांची वाढ केली.
सर्फ एक्सेल इझी वॉश, सर्फ एक्सेल क्विक वॉश, विम बार तसंच लिक्विड, लक्स-रेक्सोना साबण, पॉन्ड्स टॅल्कम पावडरच्या किमतीत वाढ झाली आहे. या वस्तूंच्या वाढीत्या किमतीवर कंपनीनेही चिंता व्यक्त केली आहे.