माय महाराष्ट्र न्यूज:अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उष्णतेने कहर केला आहे. पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे .
तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा धोका कायम आहे.हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भाच्या काही भागांत
गारपीट होण्याची, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पिंकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी
आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. दरम्यान मंगळवारी (2 मे) संपूर्ण देशात मेघगर्जनेसह पाऊस पडणायची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये
आज गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.पुढील 3 ते 4 दिवसांसाठी मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, सोलापूर, मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला,
वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.