माय महाराष्ट्र न्यूज:राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा
निर्णय जाहीर केला आहे. कुठे तरी थांबायचं विचार केला पाहिजे,असे म्हणत शरद पवार यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हणले आहे..राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या शरद
पवार यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन आज मुंबई येथे होत आहे. यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे..गेल्या ६० वर्षांपासून देशाच्या राजकारणात शरद पवार नावाचं घोंघावणारं वादळ आता संसदीय
राजकारणात दिसणार नाही. योग्य वेळी भाकरी फिरवावी लागते, ती नाही फिरवली तर ती करपते, असं सूचकपणे शरद पवार म्हणाले होते. आज त्यांनी भाकरी फिरविण्याची सुरुवात स्वत:पासून केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याचं सांगत पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी केली. १ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर
कुठेतरी थांबण्याचा विचार मनात आला, असं सांगताना आता नवा अध्यक्ष कोण, याचा विचार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी करावा, असं पवार म्हणाले.मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी ही घोषणा केली.
शरद पवार यांनी कार्यक्रमात ही घोषणा करताच समोर उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला. शरद पवार आपला निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत सभागृह सोडणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला.
शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृहातील अनेक नेते व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. धनंजय मुंडेंसह काही नेत्यांनी तर व्यासपीठावर जात शरद पवारांचे पाय धरले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती केली.
मात्र, नेते व कार्यकर्त्यांच्या या भूमिकेवर शरद पवार आता काय बोलतात? आपला निर्णय मागे घेणार का?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.’लोक माझे सांगाती’चे पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, कुठे
थांबायच हे मला कळत. गेली सहा दशके राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर काम केल्यानंतर मी आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काही जणांना अस्वस्थ वाटेल. मात्र, मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी समिती
शरद पवार म्हणाले, आता राष्ट्रवादी काँग्रेसने एक समिती नेमावी. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवर, जंयत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, फौजिया खान, झिरवळ आदी असतील.
राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय या समितीने घ्यावा. सर्व कार्यकर्ते, नेत्यांना अधिकाधिक वेळ देणार, सर्वांना सोबत घेऊ जाणारा, असा अध्यक्ष निवडावा. राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडताना, या सर्वांचा विचार करावा.