नेवासा
नेवासा गावात चिंचबन ते नेवासा रोडवर ज्ञानेश्वर मंदीरापाठीमागे चोरुन वाळु वाहतुक करणारा टेम्पो एलसीबी पोलिस पथकाने पकडला आहे.
याबाबद स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ संदीप संजय दरंदले यांनी नेवासा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादित म्हंटले आहे की, दि. 09 मे 2023 रोजी मी व पोहेकॉ दत्तात्रय विठठल गव्हाणे, पोना ज्ञानेश्वर नामदेव शिंदे असे आम्ही खाजगी वाहनाने नेवासा पोलीस स्टेशन हददीत पाहीजे व फरारी आरोपीचा शोध घेत असताना पोहेकाँ दत्तात्रय विठठल गव्हाणे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, नेवासा गावात ज्ञानेश्वर मंदीरापाठीमागे नेवासा खुर्द ता नेवासा येथे एक विटकरी रंगाचा टाटा कंपनीचा 407 मडेलचा टेम्पो विना परवाना बेकादेशिररित्या वाळू भरून चोरून वाहतुक करीत आहे. तुम्ही आता ज्ञानेश्वर मंदीरा पाठीमागे सापळा लावुन थांबल्यास तो मिळुन येईल, अशी खात्रीशीर गुप्त बातमी मिळाल्याने आम्ही लागलीच नेवासा पोलीस स्टेशनला जावुन तेथील नेमणुकीचे पोहेकॉ टी.बी. गिते यांना बातमीतील हकीकत समजावुन सांगीतल्याने पोहेकॉ गिते यांनी दोन पंचांना नेवासा पोलीस स्टेशनला बोलावुन घेवुन त्यांना बातमीतील नमुद हकीकत समजावुन सांगुन सदर ठिकाणी छापा टाकणेकामी पंच म्हणुन हजर राहण्याची विनंती केल्याने ते पंच म्हणुन सोबत येण्यास त्यांनी सहमती दर्शविली.
आंम्ही वरील नमुद पोलीस स्टाफ व दोन पंच असे नेवासा पोलीस स्टेशन येथून खाजगी वाहनाने निघुन बातमीतील नमुद ठिकाणी जावून खात्री केली असता नेवासा गावात चिंचबन ते नेवासा रोडवर ज्ञानेश्वर मंदीरा पाठीमागे सापळा लावुन थांबलो असता थोड्यावेळाने नमुद बातमी प्रमाणे एक विटकरी रंगाचा टाटा कंपनीचा 407 मडेलचा टेम्पो चिंचबन कडुन ज्ञानेश्वर मंदीराकडे येताना दिसला आमची व पंचांची खात्री होताच सदर ठिकाणी 02 वाजेचे सुमारास टेम्पोवरील चालकास थांबविण्याचा इशारा केला असता सदर टेम्पोवरील चालकाने टेम्पो रोडचे कडेला थांबविला. त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव लक्ष्मण बहीरुनाथ पवार (वय 35 वर्षे) रा. गंगानगर, ता.नेवासा असे असल्याचे सांगीतले.
सदर पकडलेल्या टेम्पोची दोन पंचासमक्ष पाहणी करता सदर टेम्पोमध्ये वाळु मिळुन आल्याने सदर चालकास वाळु वाहतुकीबाबत परवाना आहे अगर कसे याबाबत विचारपुस केली असता त्याने कोणताही प्रकारचा परवाना नसले बाबत सांगीतले. सदर टेम्पो चालकास टेम्पोचे मालकाबाबत विचारपुस केली असता त्याने टेम्पो मालकाचे नाव अरुण गोंजारी रा. नेवासा बुद्रुक ता. नेवासा हा मालक असल्याचे सांगीतले व त्याचेच सांगणे वरून मी चोरुन वाळु वाहतुक करतो असे सांगीतले.
सदर टेम्पो चालकाने व मालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना बेकायदेशिरपणे शासकीय वाळु चोरुन वाहतुक करताना मिळुन आला आहे.
पकडलेल्या टेम्पोचे व वाळुचे वर्णन खालील प्रमाणे…
3 लाख रुपये किंमतीचा एक विटकरी रंगाचा टाटा कंपनीचा 407 मोडेलचा विना नंबरचा जूना टेम्पो व टेम्पो मध्ये 10 हजार रुपये किमतीची ची नमुद टेम्पो मध्ये 01 ब्रास शासकीय मालकीची वाळु असा एकूण 3 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुददेमाल मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष टेम्पोचा व वाळुचा पंचनामा पोहेकॉ टी. बी. गिते नेमुणक नेवासा पोस्टे यांनी खाजगी वाहनाचे लाईटचे उजेडात जागीच करुन वरील वर्णनाचा मुददेमाल जागीच जप्त करुन ताब्यात घेवुन मुददेमालासह पोलीस स्टेशनला आलो.
टेम्पो चालक लक्ष्मण बहीरुनाथ पवार (वय 35 वर्षे) रा. गंगानगर ता नेवासा व टेम्पोचा मालक अरुण गोंजारी (पुर्ण नाव माहीत नाही) रा. नेवासा बुद्रुक ता नेवासा (फरार) यांचेविरुदध भादवि कलम 379 प्रमाणे कायदेशिर फिर्याद आहे.या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (बातमी तील चित्र काल्पनिक आहे)