Friday, December 3, 2021

‘कापडी मास्क वापरणं टाळा’, डॉक्टरांनी सांगितले कारण हा आहे पर्याय…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम:कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार इतक्या झपाट्यानं का होत आहे, याबाबत अनेक संशोधनं झाली आहेत. नुकतंच मेडिक जर्नल द लैंसेटनं सांगितलं, की हवेच्या माध्यमातूनदेखील कोरोनाचा प्रसार (Covid 19 Spreads Through Air) होत आहे.

त्यांनी आपल्या अहवालात सांगितलं, की कशाप्रकारे कोरोना हवेतून पसरतो. यानंतर लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. आता याप्रकरणी मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉक्टर फहीम यूनुस म्हणाले, की द लैंसेटच्या अहवालामुळे घाबरण्याचं काही कारण नाही.

डॉक्टर फहीम म्हणाले, की हे आपल्याला माहिती आहे की कोरोना हवेतून पसरतो. मात्र, हवेतून कोरोना पसरण्याचा अर्थ असा अजिबातही नाही की हवाच कोरोना संक्रमित आहे. याचा असा अर्थ आहे, की हवेतही कोरोना विषाणू बराच वेळ राहू शकतो.

डॉक्टर फहीम यांनी असा सल्ला दिला, की कापडाचे मास्क वापरणं बंद करा. कापडाच्या मास्कऐवजी आता तुम्ही N95 किंवा KN95 मास्क वापरणं गरजेचं आहे. एका मास्कचा वापर तुम्ही 24 तास करा. वापर केल्यानंतर हे मास्क एका पेपर बॅगमध्ये ठेवा.

यानंतर तुम्ही दुसऱ्या मास्कचाही पूर्ण दिवस वापर करा आणि हे मास्कदेखील वापरानंतर पेपर बॅगमध्ये ठेवा. यानंतर पहिल्यांदा ठेवलेलं मास्क तुम्ही पुन्हा वापरु शकता. याप्रमाणे मास्क बदलत राहा. तुमचे मास्क चांगले असल्यास अशाच पद्धतीनं तुम्ही एक आठवडादेखील हे मास्क वापरु शकता.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!