Saturday, November 27, 2021

तर पालकमंत्र्याना नगर जिल्ह्यात फिरू देणार नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :राज्य सरकारचा निष्काळजीपणा, चुकीचे धोरण व जिल्हा प्रशासनाचा नियोजन शून्य व ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील परिस्थिती प्रशासनाच्या हात बाहेर गेली आहे. भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी असून जोवर होत असलेला

सर्वप्रकारचा काळाबाजार थांबून रुग्णांना सर्व सुविधा तातडीने मिळणार नाही तोवर शांत बसणार नाही. आज सोम्य भूमिका घेत व राजकारण न करता पालकमंत्रींना मागण्यांचे निवेदन दिले आहे. करोनाच्या नियंत्रणासाठी जर तातडीने चांगल्या उपाययोजना राबवल्या नाहीतर भाजप

पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा भाजपचे माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांनी दिला.शहर भाजपच्या वतीने पालकमंत्री हसन मूश्रीफ यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेवून विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय अगकर, उपाध्यक्ष सचिन पारखी, उमेश साठे आदी उपस्थिती होते.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, जिल्ह्यात रेमडीसिव्हचा काळा बाजार राजरोसपणे सुरु आहे. सामान्य नागरिकांना रेमडीसिव्हर व बेड मिळत नाहीत यामुळे अनेक जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. बेड व

रेमडीसिव्हर, आक्सिजन मिळत नसल्याने नागरिकांना आपल्या कुटुंबियांचे मरण डोळ्यासमोर पहावे लागत असून अनेक रुग्णांचे नातेवाईक बेड व रेमडीसिव्हर, आक्सिजन साठी दिवस रात्र फिरत आहेत.

या संकट काळात काहीजण परिस्थीचा गैरफायदा घेत नागरीकांची लुट करत माणुसकीला काळिमा फासत आहेत. यात मोठ्याप्रमाणात सर्वसामान्य, गरीब नागरिक अक्षरशः भरडला जात आहे. तसेच यासर्व गोष्टीसाठी नागरिकांची राजरोसपणे लुट सुरू आहे.

या सर्व गोष्टींना राज्य सरकारचे चुकीचे धोरण व जिल्हा प्रशासनाचा निष्काळजीपणा व ढिसाळ कारभार कारणीभूत ठरत आहे. तातडीने यात सुधारणा झाली नाहीतर भाजप शांत बसणार नाही.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!