Wednesday, May 25, 2022

राधाकृष्ण विखे पाटीलांचा अजित पवार यांच्यावर निशाणा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्‍यातील जनतेची फसवणूक करणारा हा अर्थसंकल्‍प आहे. आघाडी सरकारच्‍या विकासाची पंचसूत्री बिघडलेलीच असल्‍याचे यातून दिसून येते,’ अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते

राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्याचा अर्थसंकल्‍प सादर झाल्‍यानंतर प्रसारमाध्‍यमांशी बोलताना विखे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे

अनुदान देण्‍याची घोषणा सरकारने दोन वर्षांपूर्वीच केली होती. यावर्षीच्‍या अर्थसंकल्‍पातही पुन्‍हा आश्‍वासनच देत शेतकऱ्यांना फसवलं आहे. केंद्र सरकारच्‍या अनुदानातून सुरू असलेल्‍या कृषी योजना या सरकारच्‍या

काळात बंद पडलेल्‍या आहेत. तर दुसरीकडे शेतकरी महिलांसाठी योजना जाहीर करुन त्यांना मृगजळच दाखवलं आहे. राज्‍यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा या सरकारच्‍या काळात मोठा बट्याबोळ झाला. याबाबत ठाम भूमिका न मांडता

या योजनेतूनच बाहेर पडण्‍याचे अर्थसंकल्‍पातून केलेले सुतोवाच म्‍हणजे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्‍याचं धोरण आहे. शेतकऱ्यांच्‍या जीवावर विमा कंपन्‍यांनी मोठा लाभ मिळवला. यावर मात्र सरकार शब्‍दही काढायला

तयार नाही. एकीकडे मुद्रांकामध्‍ये कोट्यवधी रुपयांची सूट देण्‍याची घोषणा करताना शेतकऱ्यांची वीज बिल माफी, एसटी कामगारांच्‍या बाबतीत अर्थसंकल्‍पामध्‍ये कोणतंही भाष्‍य अर्थमंत्र्यांनी केलं नाही,’ असं म्हणत विखे पाटील यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राज्‍यातील विभागांच्‍या विकासाचा समतोल राखण्‍यासाठी या अर्थसंकल्‍पात कोणतंच धोरण नसल्‍याने हा अर्थसंकल्‍प केवळ धनदांडगे, बिल्‍डर यांच्‍यासाठी धार्जिणा आहे, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!