Tuesday, May 17, 2022

पुढील काही तासांत याठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता तर नगर जिल्ह्यात….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आजही राज्यात अवकाळी पावसाचा धोका कायम आहे. आज कोकण, घाट परिसर, आणि लगतच्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील काही तासांत याठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड,

हिंगोली, अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना या 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत. दरम्यान अनेक ठिकाणी वेगवान

वारे वाहणार असून वाऱ्यांचा 30 ते 40 किमी प्रतितास इतका राहण्याची शक्यता आहे. रब्बी हंगाम शेवटच्या टप्प्यात असून अनेक ठिकाणी पिकांची काढणी झाली आहे. पावसाळ्यात राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं आधीच खरीप हंगाम वाया गेलं आहे.

त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाल्यानं राज्यातील शेतकरी धास्तावला आहे.उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. पुढील चार दिवस राज्यात कोणाताही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाही.

चारही दिवस राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची शक्यता आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील किमान आणि कमाल तापमान वाढण्याची शक्यता आहे.अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे

रब्बी हंगामातील पिकं धोक्यात आली असून, पिकांचं नुकसान झालं तर राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!