Tuesday, May 24, 2022

राज्यातील जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्प : विखे पाटील

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असून केवळ मोठमोठी स्वप्न दाखवली गेली आहेत. हा अर्थसंकल्प म्हणजे आघाडी सरकारच्या विकासाची पंचसुत्री बिघडलेलीच

असल्याची खोचक प्रतिक्रिया आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना आ. विखे पाटील म्हणाले की, या सरकारने मागील दोन वर्षात केवळ घोषणा केल्या

परंतु कृती शुन्य होती. या अर्थसंकल्पातून सरकारने पुन्हा मोठी स्वप्न दाखवून बाराबलुतेदारांसह शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसले असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.नियमित कर्जफेड करणार्‍यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा

या सरकारने दोन वर्षांपूर्वी केली होती. केंद्र सरकारच्या अनुदानातून सुरु असलेल्या कृषि योजना या सरकारच्या काळात बंद पडलेल्या असताना शेतकरी महिलांसाठी योजना जाहीर करुन पुन्हा एकदा मृगजळच दाखविले असल्याची टीका त्यांनी केली.

याबाबत ठाम भूमिका न मांडता या योजनेतूनच बाहेर पडण्याचे अर्थसंकल्पातून केलेले सुतोवाच म्हणजे शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडण्याचे धोरण असून शेतकर्‍यांच्या जीवावर विमा कंपन्यांनी मोठा लाभ मिळविला यावर मात्र सरकार शब्दही काढायला तयार नाही.

एकीकडे मुद्रांकामध्ये कोट्यावधी रुपयांची सुट देण्याची घोषणा करताना शेतकर्‍यांची वीजमाफी, एसटी कामगारांच्या बाबतीत अर्थसंकल्पामध्ये कोणतेही भाष्य अर्थमंत्र्यांनी केले नाही. याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच राज्यातील विभागांच्या

विकासाचा समतोल राखण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतेच धोरण नसल्याने हा अर्थसंकल्प केवळ धनदांडगे, बिल्डर यांच्यासाठी धार्जिणा असल्याची प्रतिक्रिया आ. विखे पाटील यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!