माय महाराष्ट्र न्यूज: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेल्या आठवड्यात स्टिंग ऑपरेशनचे एक पेनड्राईव्ह सादर केले होते. फडणवीसांनी त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजप
नेत्यांना अडकविण्यासाठी कशाप्रकारे कट रचला जात आहे याचा पुरावा असल्याचा दावा केला होता. संबंधित स्टिंग ऑपरेशन हे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातील आहे. फडणवीसांनी अधिवेशनात
स्टिंग ऑपरेशनचा पेनड्राईव्ह सादर केला तेव्हा प्रवीण चव्हाण यांच्यावरही गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपांनंतर वकील प्रवीण चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत फडणवीसांच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं होतं.
तसेच ते कथित स्टिंग ऑपरेशन हे तेजस मोरे या तरुणाने केलं असल्याचा आरोप प्रविण चव्हाण यांनी केला असा दावा केला होता. तेजस मोरेने चव्हाण यांच्या कार्यालयात एक घड्याळ लावलं होतं. त्यात कॅमेरा बसवला होता.नंतर आवाज बदलवून हे कथित स्टिंग ऑपरेशन
करण्यात आलं, असा आरोप प्रवीण चव्हाणांनी केला आहे. या आरोपांनंतर आता तेजस मोरेने ‘न्यूज 18 लोकमत’सोबत फोनवर बातचित करुन सर्वात मोठा खुलासा केला आहे. तेजस मोरेने आपला या प्रकरणात वापर केला गेला असल्याचा दावा केला आहे.
प्रवीण चव्हाण यांच्या खोटारडेपणा संदर्भात आपण लवकरच मोठा भंडाफोड करणार असल्याचा खुलासा तेजस मोरेने केला आहे. “प्रवीण चव्हाण यांच्याच सांगण्यावरुन पोलीस भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करत होते. त्यातूनच पुणे पोलिसांकडून जळगावात
गिरीश महाजनांविरोधात रेड टाकण्यात आली. त्यावेळी पोलिसांची औरंगाबाद पासूनच्या जेवणाची आणि राहण्याची सगळी व्यवस्था माझ्याकडे होती. गिरीश महाजन आणि रवींद्र बराटे यांच्या फाईलसुद्धा प्रवीण चव्हाण यांनीच ड्राफ्ट करुन ठेवले होते. प्रवीण चव्हाण
हे सगळं खडसे साहेबांच्या सांगण्यावरुन करत होते. गिरीश महाजन यांचे ड्रग्स पेडलर्सशी संबंध आहेत, असे दाखवून त्यांच्यावर मोका लावायचा होता. त्यांनी मला तसं सांगितलं होतं. माझ्याकडे त्यांचे सगळे व्हाट्सअॅप चॅट आहेत”, असा धक्कादायक खुलासा तेजस मोरेने केला आहे.
तेजस मोरे हा जळगावातील रहिवासी आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची यामुळे जळगाव कनेक्शन उघड झाले आहे.तेजस मोरे याचे वडील अभियंता होते. तर तेजस हा बांधकाम व्यावसायिक असून गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्याचे जळगावातील
घर बंद आहे. त्याने काहीतरी घोटाळा केला आहे त्यामुळे त्याच्या घरी पोलिस यायचे असं शेजारी-पाजारी सांगतात.