माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईत आधीच वैतागलेल्या जनतेला आणखी एक मोठा झटका बसणार आहे कारण मॅगी आणि चहासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. हिंदुस्तान
युनिलिव्हर आणि नेस्ले यांनी त्यांच्या अनेक उत्पादनांच्या किमतीत वाढ केली आहे. त्यानुसार चहा, कॉफी, दूध आणि मॅगीच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. वाढणाऱ्या महागाईमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
हिंदुस्तान युनिलिव्हरने ब्रू कॉफीच्या दरात ३-७ टक्के आणि ब्रू गोल्ड कॉफीच्या दरात ३-४ टक्क्यांनी वाढ केली आहे. इन्स्टंट कॉफी पाऊचच्या किमतीदेखील ३ वरून ६.६६ टक्के वाढल्या आहेत. याशिवाय ताजमहाल
चहाची किंमत ३.७ टक्के वरून ५.८ टक्के पर्यंत वाढवण्यात आली आहे. ब्रुक बाँडच्या सर्व प्रकारच्या चहाच्या किंमतीत १.५ टक्क्यांवरून १४ टक्के वाढ करण्यात आली आहे.तर मॅगीच्या दरात ९ ते १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
वाढलेल्या किंमतीनंतर मॅगीच्या ७० ग्रॅमच्या पॅकसाठी १२ रुपयांऐवजी आता १४ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १४० ग्रॅम मॅगी साठी आता 3 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. यापूर्वी ५६० ग्रॅम मॅगीच्या पॅकसाठी
९६ रुपये मोजावे लागत होते, मात्र यासाठी आता १०५ रुपये मोजावे लागणार आहेत.नेस्लेने एक लिटर A+ दुधाच्या किमतीत वाढ केली आहे. यापूर्वी यासाठी ७५ रुपये मोजावे लागत होते, त्यासाठी आता
७८ रुपये मोजावे लागणार आहेत. नेस्कॅफे क्लासिक कॉफी पावडरच्या दरात ३ ते ७ टक्क्यांची वाढ केली आहे