Wednesday, May 25, 2022

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे कडाडले: संपूर्ण नेवासा तालुक्यातील वीज सबस्टेशन कुलूप ठोकून बंद करण्याचा इशारा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा येथे भाजपच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी खासदार तुकाराम गडाख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

जोपर्यंत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत वीज वितरण कंपनीच्या कुठल्या अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला गावामध्ये फिरकू देणार नाही. संपूर्ण तालुक्यातील वीज सबस्टेशन कुलूप

ठोकून बंद करण्याचा इशारा माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी यावेळी दिला.नेवासा येथे श्रीरामपूर रोडवरील खोलेश्वर गणपती मंदिरापासून महावितरण कंपनीच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. महावितरण कंपनीच्या

कार्यालयासमोर मोर्चा आला असता उपस्थित मोर्चेकऱ्यांनी या महाविकास आघाडी सरकारचे करायचे काय? खाली डोके वर पाय, अशा घोषणा देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की, शेतकऱ्यांची

आर्थिक स्थिती खूपच खालावलेली असताना कुठल्याच शेतमालाला रास्त भाव मिळत नसून शेतकऱ्यांची पिके शेतामध्येच उभे आहेत. सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

पाण्याविना शेतकऱ्यांची पिके हाता तोंडाशी आलेली असताना व धरण शंभर टक्के भरूनही शेतीसाठी पाणी सोडले जात नाही. त्यात महाविकास आघाडी सरकारकडून प्रत्येक दोन महिन्याला शेतकऱ्यांकडून सक्तीने पाच हजार रुपये वसूल केल्या जात आहे.

सद्यस्थितीला सरकार शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना ६७ टक्के अनुदान देते म्हणजेच सोळा तासाचे पैसे सरकार भरते आणि वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांना फक्त आठ तासच वीज देते. शेतकऱ्यांचे वीज बिल जर सरकार

भरत असेल तर वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांकडून कुठली वसुली पठाणी वसुली करते असा सवाल करत त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कारभाराचा निषेध केला.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!