Wednesday, May 25, 2022

WhatsApp वर आता आपल्याला आता केवळ एका युजरलाच मेसेज फॉर्वर्ड करू शकणार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. या एकाच प्लॅटफॉर्मवर फोटो, व्हिडीओ, फाइल्स, चॅट, ऑडिओ-व्हिडीओ कॉल, पेमेंट्स अशा गोष्टी मिळत असल्याने हे जगभरात विश्वासार्ह, पॉप्यलर App ठरलं आहे.

WhatsApp आपल्या युजर्सला सतत नवे अपडेट देत असतं. आता कंपनी App च्या फॉर्वर्ड मेसेज सर्विसवर काम करत आहे. WhatsApp आपल्या मेसेज फॉर्वर्ड सर्विसची लिमिट सेट करत आहे. आता

युजर्स एका वेळी केवळ एका युजरलाच मेसेज फॉर्वर्ड करू शकेल. हे पाऊल कंपनीने App च्या माध्यमातून चुकीची माहिती आणि फेक न्यूजचा प्रसार रोखण्यासाठी उचललं आहे.कंपनीने आधीच App वर तुम्ही किती वेळा चॅट फॉर्वर्ड करू शकता हे रिस्ट्रिक्टेड केलं आहे.

परंतु नव्या रिपोर्टनुसार, येणाऱ्या काळात ही लिमिट आणखी कमी केली जाऊ शकते. WhatsApp लवकरच मेसेज एकाहून अधिक ग्रुममध्ये फॉर्वर्ड करण्यावर बंदी आणू शकेल.WABetainfo ने एक रिपोर्ट जारी केला होता. या रिपोर्टमध्ये इन्स्टंट मेसेजिंग

प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आता सर्व मेसेज फॉर्वर्ड करण्याची लिमिट कमी करणार असल्याचं म्हटलं होतं. या नव्या आणि अपडेटेड फीचरला व्हॉट्सअॅप बीटाच्या बीटा v2.22.7.2 अँड्रॉइड वर्जनमध्ये अपडेट केलं जाईल.

मेसेजिंग App व्हॉट्सअॅपवर चुकीचा मेसेज व्हायरल होऊ नये म्हणून युजरला त्यांचा फॉर्वर्ड मेसेज रिव्ह्यू करण्यासाठी आणि चुकीच्या बातमीचा किंवा मेसेजचा प्रसार मर्यादित करण्यासाठी हे नवं अपडेट फायद्याचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!