Tuesday, May 24, 2022

महसूलमंत्री थोरात म्हणाले मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज राजकीय धुळवड

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी धुळवडीच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधला तसेच त्यांनी राज्याच्या राजकारणावर भाष्य केलं. थोरात म्हणाले, आपल्याकडं धुळवडीचा

सण वर्षातून एकदाच साजरा केला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज राजकीय धुळवड खेळली जात आहे. व्यक्तीद्वेष आणि व्यक्तिगत आरोपांची राळ उडविली जात आहे. अशी राजकीय धुळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांसमोर बोलताना मी राज्यात भाजपचं सरकार पुन्हा येऊ देत नसतो, असं वक्तव्य केलं. त्याला थोरात यांनी सहमती दर्शविली. ‘पवार योग्यच

बोलले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन म्हणत होते. मात्र, ते तसे म्हणाले की ते पुन्हा येत नाहीत, हा अनुभव आहे’, असा टोलाही थोरात यांनी लगावला.

माजी खासदार राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचं सांगत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना थोरात म्हणाले, ‘महाविकास आघाडी ही किमान समान कार्यक्रमावर आधारित आहे.

त्याची अंमलबजावणी करताना काही प्रमाणात दिरंगाई होऊ शकते. पण आम्ही किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करत आहोत.काँग्रेसनं पक्षांतर्गत फेरबदल करण्यासाठी विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष नाना पटोले यांचा

त्या पदाचा राजीनामा घेऊन त्यांच्याकडं पक्षाचे प्रदेशाध्यक्षद सोपविले. तेव्हापासून अध्यक्षपदाची निवडणूक रखडली आहे. यासाठी महाविकास आघाडीनं बदललेल्या नियमांना मंजुरी मिळाली नाही. त्यातच या विरोधात भाजपनं न्यायालयातही

धाव घेतली आहे. हा धागा पकडून थोरात यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रखडण्यामागं भाजपच असल्याचा आरोप केला.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!