Wednesday, May 25, 2022

आरे देवा:१० वी चा इंग्रजीचा पेपर फुटला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. कॉपी आणि पेपरफुटीचे प्रकार थांबावेत यासाठी राज्य शिक्षण मंडळ प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसत आहे. परंतू एवढं असूनही

पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीयेत. बीडच्या साक्षाळपिंप्री गावात दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.साक्षाळपिंप्री गावातील एका झेरॉक्सच्या दुकानात इंग्रजीचा पेपर २० रुपयांत

विकला जात होता. सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापेमारी केली असता त्यांना हा धक्कादायक प्रकार कळून आला. या प्रकारामुळे शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

१५ मार्चपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून १९ मार्चरोजी इंग्रजीचा पेपर होता. यादरम्यान बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील केंद्रावर परीक्षा सुरू असताना, संजय मुरलीधर पालवे यांच्या झेरॉक्स

सेंटरमधून उत्तरांच्या प्रती विक्री केल्या जात होत्या. यादरम्यान कुमावत यांच्या पथकाने झेरॉक्स सेंटरवर छापा टाकला. यावेळी प्रश्न क्र. ३ व ४ च्या झेरॉक्स प्रती २० रुपयांना एक याप्रमाणे विक्री केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

यादरम्यान पोलिसांनी झेरॉक्स चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडे मिळून आलेल्या २ प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येकी ८० प्रती आणि झेरॉक्स मशिनही पोलिसांनी जप्त केलं आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!