Tuesday, May 24, 2022

नगर ब्रेकिंग:कार व पिकअप समोरा-समोर अपघात एक जणांचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठ्या अपघाताची बातमी समोर येत आहे.नगर-कल्याण महामार्गावर आळेगावच्या परीसरात लवणवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री

सव्वाबारच्या सुमारास कार व पिकअप यांचा ओव्हरटेक करताना समोरा-समोर अपघात झाल्याने एकाचा मृत्यू झाला. प्रवीणकुमार नवनाथ आहेर (रा. पळसपूर, ता. पारनेर, जिल्हा अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रात्री सव्वाबाराच्या सुमारास सिद्धांत बाळासाहेब खंडागळे (रा. हसनापूर, ता. शेवगाव, जिल्हा अहमदनगर) हा त्याच्या ताब्यातील पिकअप एम. एच 16 सी. डी 0910 भरधाव वेगात आळेफाट्याच्या

दिशेने घेऊन जात असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार्‍या सेलेरो एम. एच 46 बी. ई 0657 हिला जोराची धडक दिली. अपघात इतका जोराचा होता की, सेलेरो कारमधील चालक प्रवीण आहेर याचा जागीच मृत्यू झाला.

यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी संतोष नवनाथ आहेर यांच्या फिर्यादीवरून अपघात घडवून जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी चालक सिद्धांत खंडागळे विरुद्ध

आळेफाटा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रफिक तडवी पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!