माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थीनीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत एकाने तिच्या पित्याकडे दहा
हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यातील सात हजार रुपये त्याने एका युपीआय पेमेंट अॅपच्या माध्यमातून स्वीकारलेही. मात्र, त्यासाठी त्याने मित्राचा मोबाइल नंबर दिला होता. आता पोलिस त्यावरून त्याचा शोध घेत आहेत.
राहाता तालुक्यातील एका गावात अल्पवयीन विद्यार्थिनीचा आक्षेपार्ह फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करण्याची धमकी वैभव जगताप हा आरोपी देत होता. हे टाळयाचे असेल तर १० हजार रूपये द्यावे लागतील
अशी मागणी त्याने केली. त्याच्याविरूद्ध आधीच बलात्कार आणि अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याला घाबरून खंडणी देण्यास मुलीच्या वडिलांनी तयारी दर्शविली.
तडजोडीअंती ७ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, त्यावेळी रोख पैसे नव्हते. त्यामुळे आरोपी वैभव जगताप याने त्याच्या एका मित्राचा मोबाइल नंबर दिला. त्यावर युपीआय पेमेंट अॅपच्या सहाय्याने ७ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले.
यासंबंधी मुलीच्या वडिलांनी राहाता पोलिस ठाण्यात तक्रार दिली. खंडणी दिली नाही, तर मुलीचे इतर एका युवकांसोबतचे आक्षेपार्ह फोटो गावातील नातेवाईकांना पाठविण्याची धमकी त्याने
दिली होती. राहाता पोलिसांनी आरोपी विकास जगताप (रा.रामपूरवाडी ता.राहाता) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याने ज्या मोबाइल नंबरच्या आधारे खंडणी वसूल केली त्यावरून त्याचा शोध घेण्यात येत आहे.