नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता माध्य. व उच्च माध्यमिक विद्यलयाची इयत्ता १२ वी शास्र शाखेची विद्यार्थ्यांनी गौरी प्रताप खरड ही ९०.५० टक्के
गुण मिळवून तालुकात प्रथम आली आहे.
भेंडा येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता माध्य. व उच्च माध्यमिक विद्यलयाने एच.एस.सी परीक्षेच्या फेब्रु. २०२३ परीक्षेचा उत्कृष्ट निकाल लागल्याने विद्यालयाने उत्कृष्ट निकाल परंपरा कायम राखली आहे. यामध्ये विज्ञान शाखेत ४३८ पैकी ४२४ विदयार्थी उत्तीर्ण झाले असुन ९६ .८०% निकाल लागला तर कला शाखेत ११५ पैकी ९९ उत्तीर्ण होऊन निकाल ८६.८ टक्के निकाल लागला तर वाणिज्य शाखेत ६७. पैकी ६२ उत्तीर्ण होऊन ९२ ५३
निकाल लागला आहे.
विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक गौरी प्रताप खरड ५४३ गुण ( ९०. ५० टक्के) द्वितीय क्रमांक साक्षी संजय
वाबळे ५११ गुण (८५ .१७ टक्के), तृतीय क्रमांक ओम संतोष फुलारी ४८० गुण ( ८०.०० टक्के).
कला शाखेत प्रथम क्रमांक चैताली बाबासाहेब वांढेकर ४६७ गुण ( ७७ ८३ टक्के ) द्वितीय क्रमांक अनुजा अविनाश टाक ४२० गुण ( ७० टक्के) तृतीय क्रमांक आकांक्षा भाऊसाहेब आढागळे ४९८ गुण ( ६९ ६७ टक्के)
वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक शुभांगी ज्ञानदेव जामकर ५०१ गुण ( ८३ ५० (टक्के), द्वितीय क्रमांक ओम ज्ञानेश्वर वाघ ४७६ गुण ( ७९.३३ टक्के) तृतीय क्रमांक प्राची मच्छिंद्र इंगळे ४५९ गुण( ७६.५० टक्के) यांनी यश संपादन केले अशी माहीती प्रभारी विद्यालयाचे प्राचार्य तथा शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भारत बाबळे यांनी दिली.
यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटिल,विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग, जेष्ठ संचालक अँड देसाई देशमुख, सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रविंद्र मोटे आदीनी अभिनंदन केले.