Tuesday, May 24, 2022

युरियावर प्रति गोणी ३७०० रुपये सब्सिडी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार युरियावर प्रति गोणी सुमारे ३७०० रुपये सब्सिडी देत आहे. शेतकऱ्यांना युरियासह अन्य खते माफक दरात मिळावीत यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत.

त्यासाठी सरकार युरिया सब्सिडीचा मोठा भार उचलत आहे, अशी माहिती केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सब्सिडी दरात मिळणाऱ्या युरियाची

मूळ किंमत किती आहे याचीही माहिती दिली. भारतात युरियाची किंमत प्रति गोणी २६६.७० रुपये आहे. तर पाकिस्तानात ८०० रुपये, इंडोनेशियात ६०० रुपये, चीनमध्ये २,१०० रुपये, बांगलादेशात ७१९ रुपये,

अमेरिकेत ३,०६० रुपये आणि ब्राझीलमध्ये ३,६०० रुपये युरियाची किंमत असल्याचे मांडविया यांनी सांगितले.विदेशात युरियाची किंमत प्रति गोणी ४ हजार रुपये आहे. पण भारतात युरियाची किंमत २६६ रुपये आहे.

सरकार युरियावर सुमारे ३७०० रुपये सब्सिडी देत असल्याने शेतकऱ्यांना माफक दरात युरिया उपलब्ध होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.त्यांनी सांगितले की युरियाचा देशांतर्गत वापर ३२५ लाख मेट्रिक टन आहे.

तर उत्पादन केवळ २५० लाख मेट्रिक टन आहे. यामुळे देशांतर्गत मागणीच्या पूर्ततेसाठी ७५ लाख मेट्रिक टन युरियात विदेशातून आयात केला जातो. डीएपी खताच्या प्रति गोणीवर २,६५० रुपये सब्सिडी दिली जात आहे.

खतांच्या वाढत्या किमतीचा भार शेतकऱ्यांवर पडू नये यासाठी सरकार सब्सिडीचा मोठा भार उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, खते व रसायन राज्य मंत्री भगवंत खुबा यांनी म्हटले की, केंद्र सरकार

सर्व राज्यांना एकाच दरात खतांचा पुरवठा करते. किमतीवरून राज्यांत भेदभाव केला जात नाही. सरकारला शेतकऱ्यांच्या हिताची काळजी आहे. माफक दरात पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!