Tuesday, May 24, 2022

नगरच्या त्या वकिलाने खासदार विखेंना दिला कायदेशीर इशारा; म्हणाले…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडीवर टीका करताना नवरा-बायको-वऱ्हाडीची उमपा देणारे खासदार डॉ. सुजय विखे यांना सर्वपक्षीय नेत्यांनी कडक शब्दांत उत्तर दिलं आहे. या पार्श्वभूमीवर नगरमधील

राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक वकील अ‍ॅड. सुरेश लगड यांनी विखेंना थेट कायदेशीर इशारा दिला आहे. ‘आपण महाविकास आघाडी सरकारबद्दल जे वर्णन केलं आहे, ते निश्चितच बदनामी करणारं आहे.

ते फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही प्रकारच्या कारवाईत मोडतं,’ असा इशारा देत विखेंना माफी मागण्याचा सल्ला अॅड. लगड यांनी दिला आहे. अ‍ॅड. सुरेश लगड यांनी महटलं आहे की, ‘आपण समाजात वावरताना पूर्ण

विचारांती बोललं पाहिजे. महाविकास आघाडीला नवरा-बायको व वऱ्हाडीची उपमा देऊन अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहात. आपणास हे शोभत नाही. केवळ सवंग

प्रसिद्धीसाठी असे शब्दप्रयोग वापरु नयेत. वडीलकीच्या नात्यानं मी आपणास हे सांगू इच्छितो. त्याचा राग येऊन देऊ नये,’ असेही अ‍ॅड. लगड यांनी म्हटलं आहे.डॉ. विखे यांना उद्देशून लगड यांनी म्हटलं आहे, ‘आपण वयानं खूप लहान आहात.

आपण काय बोलतो? कुणाबद्दल बोलतो? आपल्या चुकिच्या बोलण्यानं दुसऱ्याच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो? याचं थोडातरी भान ठेवायला हवं. आपण महाविकास आघाडी सरकारचं जे वर्णन केलं ती निश्चितच

महाविकास आघाडी सरकारची जाणीवपूर्वक केलेली बदनामी आहे. आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या तोंडून अशी असंसदीय भाषा शोभत नाही. आपण अज्ञान असताना आपले पिताश्री, आपले सहकार महर्षी

आजोबा व आपल्या मातोश्री असे सर्वच काँग्रेस पक्षात होते. काँग्रेसनं आपल्या कुटुंबाला अनेक मोठी पदं दिली. आपल्या मातोश्री अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या. पक्षसंघटनेतही

आपल्या कुटुंबाला वेळोवेळी पक्षानं संधी दिली. याची आपल्या सारख्या लोकप्रतिनिधीला माहिती असूनही आपण काँग्रेसवर व महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना

या पक्षांबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बदनामी करीत आहात. हे बरोबर नाही.’

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!