Tuesday, May 17, 2022

सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची भेट

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मोठी भेट देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे.

यावेळी डीएमध्ये (डीअरनेस अलाउन्स) ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने डीएमध्ये ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२२ पासून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ३४ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी ३१ टक्के तरतूद होती. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाईपासून वाचवण्यासाठी महागाई भत्ता घटक त्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये जोडण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या ३१ टक्के डीए मिळतो. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सरकारने डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता

आता ३४ टक्के होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, सरकार वर्षातून दोनदा डीएमध्ये सुधारणा करते. यापूर्वी, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए २८ टक्क्यांवरून ३१ टक्क्यांपर्यंत वाढवला होता.

AICPI-IW च्या डिसेंबरच्या डेटापासून कर्मचारी 3% DA वाढीच्या घोषणेची वाट पाहत होते. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 3% डीए वाढीची घोषणा करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या पगारासह नवीन डीए खात्यात जमा केला जाईल.

कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, AICPI-IW निर्देशांक नोव्हेंबर 2021 मध्ये 0.8% वाढला होता आणि 125.7 वर पोहोचला होता. यावरून महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले.

आता, डिसेंबर 2021 च्या आकड्यात थोडीशी घट झाली असली तरी, जानेवारी 2022 पासून DA मध्ये 3% वाढ जाहीर करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!