माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात तक्रार करण्यासाठी काँग्रेसच्या २५ आमदारांनी त्यांनी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे.
आपल्याच पक्षाचे मंत्री आपल्याला प्रतिसाद देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. आमदारांनी एका पत्रात सोनिया गांधींना ‘चीजों को ठीक करने’ असा उल्लेख करत विनंती केली आहे. या पत्रावर आता महसूलमंत्री
बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी १०० टक्के सांगतो कोणाचीही कशाच्याही नाराजी नाही. असं थोरातांनी ठणकावून सांगितलं आहे.पुण्यात काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात जोरदार
आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली त्यावेळी त्यांनी काँग्रेस आमदारांच्या ‘कथित’ नाराजीवर भाष्य केले आहे. “५ आणि ६ तारखेला दिल्लीमध्ये सर्वपक्षीय आमदारांचे
प्रशिक्षण शिबीर आहे. त्याकरता आमचेही आमदार जाणार आहेत. त्यामुळे त्यांना दिल्ली पक्षाध्यक्षांना भेटावं वाटण साहजिक आहे. पण कुठून हा उद्योग सुरु झाला मला माहित नाही. मी १०० टक्के सांगतो
कोणाचीही कशाचीही नाराजी नाही.” असं थोरात म्हणाले आहेत.महाराष्ट्र काँग्रेसच्या २५ आमदारांनी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या लेटरहेडवर प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची मागणी केली आहे.
त्यावरून थोपटे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता बाळासाहेब थोरात हे संग्राम थोपटे यांची नाराजी दूर करण्यासाठी संग्राम थोपटेंच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती समोर आल्यावर थोरातांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
मी कोल्हापूरला प्रचाराला जात असताना दुपारचं जेवण भोरला करणार आहे आणि बातम्या चालवल्या जातात मी थोपटेंची समजूत काढायला जाणार आहे असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी हसून वेळ मारून नेली आहे.