Tuesday, May 24, 2022

HDFC बँकेचे होणार ‘या’ बँकेत विलिनीकरण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:खासगी क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. HDFC चे आता बँकेत विलिनीकरण करण्यात येणार आहे. संचालक मंडळाने या विलिनीकरणाला हिरवा कंदील दाखवला असून, आगामी

काही काळात ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. विलिनीकरणाचे वृत्त समोर येताच HDFC चे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती देण्यात आली आहे. गृहकर्ज पुरवठादारांपैकी

आघाडीची वित्त संस्था असलेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचे आता एचडीएफसी बँकेत विलिनीकरण करण्यात येणार आहे. म्हणजेच आता यापुढे HDFC बँक आणि उपकंपनी

असलेली हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन या दोन संस्था एकत्र करण्यात येणार आहेत. एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने या विलीनीकरणाला मंजुरी दिली असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला कळवले आहे.

या घोषणेनंतर शेअर बाजारात एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दोन्ही कपन्यांच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली.HDFC च्या उपकंपनी असलेल्या एचडीएफसी इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि एचडीएफसी

होल्डिंग्ज लिमिटेड या दोन्ही कंपन्या एचडीएफसी बँकेत विलीन करण्यात येतील. विलीनीकरणाच्या प्रस्तावाला नुकताच एचडीएफसीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. हे विलीनीकरण दोन्ही

बरोबरीच्या कंपन्यांचे एकत्रीकरण असल्याचे मत एचडीएफसी अध्यक्ष दीपक पारेख यांनी सांगितले. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी ही दोन उपकंपन्यांना एचडीएफसी

बँकेत विलीन करणार आहे. यातून एचडीएफसीचा एचडीएफसी बँकेत ४१ टक्के हिस्सा होईल. आर्थिक २०२४ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान, विलीनीकरणाची घोषणा झाल्यानंतर आज शेअर बाजारात त्याचे पडसाद उमटले. सकाळच्या सत्रात एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!