माय महाराष्ट्र न्यूज:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आधी कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचं सांगून सरकारला घेरलं होतं. आता त्यांनी कोरोना काळातील आणखी एका भ्रष्टाचारावरून सरकारला घेरलं आहे.
कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे या लोकांनी आपल्या नातेवाईंकाना दिले आहेत. वेश्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे सर्वांना माहीत आहे. संजय राऊत तो शब्द नेहमी वापरत असतात.
असे काही लोक या सरकारमध्ये आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सत्तापक्षाचे नेते धान खरेदी केंद्रांचे मालक होत आहेत. आमच्या शेतकऱ्यांना धानाचा बोनस हे सरकार देत नाही, असा
आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला केला. तसेच हे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा दावाही त्यांनी केला.
भाजपच्या महाजनआक्रोश मोर्चाची सुरूवात गडचिरोलीपासून झाली. कारण, गडचिरोलीपासून बुलंद होणारा आवाज हा क्रांती घडवितो. धानाला बोनस, कृषीपंपाला 24 तास वीज, वीजतोडणी
बंद करणे, कर्जमाफी आणि अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी, अवकाळी, अतिवृष्टी, वादळ, किडीची मदत तत्काळ देण्यात यावी, नवाब मलिक यांचा राजीनामा तत्काळ घ्यावा अशा विविध 16 मागण्यांसाठी हा मोर्चा आहे.
या महाविकास सरकारमध्ये भ्रष्टाचाराची ट्वेंटि-ट्वेंटी सुरू आहे. मुंबईतील बिल्डरांचा कर थकला आहे, हिंमत असेल तर तो वसूल करा. त्यांच्याकडून मालपाणी मिळते, म्हणून तेथे ढिल आणि आमच्या शेतकर्यांकडून जुलमी वसुली सुरू, अशी
घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.बारमालकांची फी 50 टक्के कमी केली. पण, गडचिरोली, नंदूरबारमध्ये शेतकर्यांचे वीजबिल 50 टक्के कमी करावं असं त्यांना वाटले नाही. विदेशी दारुवर कर अर्धा केला.
पण, शेतकर्यांना कोणतीही मदत केली नाही. या सरकारला गरिबांची नाही, तर बेवड्यांची चिंता अधिक आहे, अशी टीका त्यांनी केली.