माय महाराष्ट्र न्यूज: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येतेय. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात चालू महिन्यात मोठे फेरबदल होणार आहेत, तशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घेतला होता. विरोधकांनी पूजा
चव्हाणचा मुद्दा उचलून धरत राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राज्यभरात हे प्रकरण गाजल्यानं सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला.
तर 100 कोटी रुपये वसुली प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे राज्यात मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला.
सध्या देशमुख हे कोठडीतच आहेत.महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात चालू महिन्यातच मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा
शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये महत्वाची बैठक होणार असल्याचीही माहिती मिळत आहे.विस्तार झाल्यास नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगर जिल्ह्यातील पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीतील
आमदार रोहित पवार तसेच पारनेर-नगरचे आमदार नीलेश लंके यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कोरोना काळात केलेल्या कामामुळे नीलेश लंके यांचे राज्यभर समर्थक आहेत. पक्षातील सामान्य
कुटुंबातील चेहरा म्हणून त्यांना संधी मिळण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.आमदार लंके हे 2019 च्या निवडणुकीत जायंट किलर ठरले. त्यांनी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांचा मोठ्या फरकाने
पराभव केला. या शिवाय राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये लंके यांनी केलेले काम हे सर्वश्रुत आहे.