Wednesday, May 25, 2022

आधार कार्डला जोडला जाणार जाती-उत्पन्न दाखला,मिळणार मोठा फायदा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आधार कार्ड हे सध्या भारतीयाचं महत्त्वाचं ओळखपत्र झालं आहे. पॅन कार्डसोबतच कित्येक सरकारी योजना या आधार कार्डसोबत लिंक करण्यात आल्या आहेत. यानंतर

आता केंद्र सरकारने जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला या गोष्टीदेखील आधार कार्डशी लिंक करण्याची योजना तयार केली आहे. यामुळे शासकीय

योजनांचे पैसे थेट लोकांच्या खात्यात जमा होण्यास मदत होणार आहे.आधार आणि जातीचा तसंच उत्पन्नाचा दाखला जोडला गेल्यामुळे सरकारला ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन सिस्टीम अंमलात

आणण्यास मदत होणार आहे. या सिस्टीमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटण्याचं काम सोपं होणार आहे. केंद्र सरकार महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांपासून ही

सुविधा सुरू करणार आहे. याला कारण म्हणजे, या राज्यांनी विद्यार्थ्यांचा जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला आधारला लिंक करण्याचं काम पूर्ण केलं आहे. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर मिळणारी शिष्यवृत्ती व्यवस्था ही पूर्णपणे डिजिटल करण्याचं सुचवलं होतं. यावर काम करत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने

चालू आर्थिक वर्षात ही योजना अंमलात आणायचं उद्दिष्ट ठेवलं आहे. इकॉनॉमिक टाईम्सने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली.हा निर्णय घेण्यामागे स्कॉलरशिप व्यवस्थेतील भ्रष्टाचार थांबवण्याचा

उद्देशही आहे. कित्येक विद्यार्थ्यांना हे माहिती नसतं की आपल्याला नेमकी कोणती शिष्यवृत्ती मिळत आहे. तसंच, असंही दिसून आलं की काही संस्थांनी एकाच बँक खात्याला 10 ते 12 विद्यार्थ्यांची

नावं जोडली आहेत. अशामुळे शिष्यवृत्तीचा पैसा त्या संस्थांकडे जात होता. आता आधारशी लिंक झाल्यामुळे शिष्यवृत्तीचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!