माय महाराष्ट्र न्यूज: साखर कारखान्याच्या इतिहासात सर्वात जास्त कारखाने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बुडवले, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. त्या आंबेजोगाई येथील
सोयाबीन शेतकरी मित्र मेळाव्यात बोलत होत्या.बीडच्या केस तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात त्या बोलताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी
पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर टीका करताना कारखाना चालवण्यासाठी कर्तुत्व लागते. ते येरागबाळ्याचं काम नाही, अशा शब्दात त्यांनी पंकजा मुंडेंवर
टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला.पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, अजित पवारांनी साखर कारखाने बुडवले, त्याचा
इतिहास महाराष्ट्र देऊ शकतो. कारखान्याच्या नावाने कोट्यावधी रुपये घेतले. ते वापरले किती? असा सवाल करत कारखान्यांची कवडीमोल भावाने विक्री केली, या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली नाहीत.
अगोदर महाराष्ट्राला या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच अजित दादा बीडमध्ये आले होते तर बीडमधील अतिरिक्त उसाचा प्रश्न संदर्भात मदत जाहीर करतील, अशी अपेक्षा होती.
मात्र, ते करायचे सोडून ते इतरांवर टीका करत राहिले, हे दुर्दैव आहे, अशी टीकाही त्यांनी केली.