माय महाराष्ट्र न्यूज:मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी
पाऊसाच्या सरी बरसत आहेत. यामध्ये काही प्रदेशात गारपीटसह पावसाने जोरदार एंट्रीही केली आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यातील काही भागांत गारपीटसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
काही तासांत राज्यातील काही ठिकाणी गारपिटीसह तीव्र पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. यात सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांसह गोवा आणि उत्तर कर्नाटकातील काही प्रदेशाचा समावेश असणार आहे.
येथील भागांत तीव्र वीजा आणि गडगडासह पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील थंडीचा कडाका तुलनेत कमी झाला आहे. त्यामुळे आता
वातावरणातील बदलांना वेग आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने सुरुवात केली आहे. भारतीय हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार
महाराष्ट्रातील काही प्रदेशात पुढील काही तास गारांसह पाऊस पडणार आहे. राज्यातील सागंली, कोल्हापूरसह गोवा आणि कर्नाटकातील काही भागांचा यात समावेश असणार आहे. त्यामुळे या प्रदेशातील
नागरिकांना हवामान खात्यातकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या वादळी प्रणालीमुळे ढगांची दाटी झाली आहे. काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाला पोषक हवामान होत
असल्याने राज्यातील या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस तसेच सोसाट्याचा वारा वाहत आहे. पुढील काही तास या भागत पाऊस होणार असल्याने
घाबरुन न जाता कारण नागरिकांना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.