Monday, May 23, 2022

या तारखेनंतर महाराष्ट्रतील उष्णतेची लाट ओसरणार ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात कोकणात अवकाळी पावसाचं संकट आहे तर दुसरीकडे उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. राज्याचे तापमान

दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये एक चिंताजनक बातमी आहे. आयएमडीनं राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आजपासून 12 एप्रिल दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट

येण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे. वाशिम, वर्धा, चंद्रपूर, अमरावतीमध्ये तापमान 42 अंशाहून अधिक आहे. अमरावतीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंश किंवा त्यापेक्षा जास्त आहे. उन्हाच्या तीव्र झळा कायम असताना किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पीके वाळत असल्याने शेतकऱ्यांनाही

मोठा फटका बसत आहे. मात्र, आता उन्हापासून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. येत्या 13 एप्रिलनंतर उष्णतेची लाट ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मात्र दक्षिण विदर्भात आणखी 5 दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती राहू शकते असा अंदाज हवामान विभागानं दिला.विदर्भ, मराठवाडा ते कर्नाटकपर्यंत सध्या हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोकण, मध्य

महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान असल्याने ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात तापमानाचा पारा थोडा कमी होत असला तरी कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. शनिवारी 14 जिल्ह्यांतील तापमान चाळिशीपार होते. अकोला आणि जळगाव येथे शनिवारी (ता. ९) उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

नगर, अमरावती, चंद्रपूर येथे आहे. ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान ३२ ते ४१ अंशांच्या आसपास आहे. बुलडाणा येथे तापमान ४० अंशांच्या पुढे आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!