Wednesday, May 25, 2022

रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी; सरकारकडून नियमांमध्ये…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिधापत्रिकेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारने मोफत रेशन देण्याच्या योजनेला मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, अन्न व सार्वजनिक वितरण

विभागाकडून शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहेत. शासकीय शिधावाटप दुकानातून रेशन घेणार्‍या पात्र लोकांसाठी निश्चित केलेल्या मानकांमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन

मानकाचा मसुदा आता जवळपास तयार झाला आहे. एवढेच नाही तर यासंदर्भात राज्य सरकारांशी अनेक बैठकाही झाल्या आहेत. नवीन तरतुदीत काय बदल होणार आहे ते पाहूया.अन्न आणि सार्वजनिक

वितरण विभागाच्या मते, सध्या देशभरात 80 कोटी लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा (NFSA) लाभ घेत आहेत. त्यांच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले अनेक लोक आहेत. हे लक्षात घेऊन सार्वजनिक वितरण

मंत्रालय मानकांमध्ये बदल करणार आहे. वितरणात अनियमितता येऊ नये म्हणून नवीन मानकं पूर्णपणे पारदर्शक केले जाणार आहेत.या संदर्भात अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने सांगितले की,

मानकांमध्ये बदल करण्याबाबत राज्यांसोबत बैठक घेतली जात आहे. राज्यांनी दिलेल्या सूचनांचा समावेश करून पात्रांसाठी नवीन मानके तयार केली जात आहेत. ही मानके लवकरच निश्चित केली जातील.

नवीन मानक लागू झाल्यानंतर केवळ पात्र व्यक्तींनाच लाभ मिळेल, अपात्र व्यक्तींना लाभ मिळू शकणार नाही. गरजूंना डोळ्यासमोर ठेवून हा बदल करण्यात येत आहे.अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या

म्हणण्यानुसार, आतापर्यंत 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘एक देश, एक रेशन कार्ड (ONORC) योजना’ लागू करण्यात आली आहे. NFSA अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांपैकी 86 टक्के लोक

या योजनेचा लाभ घेत आहेत. दर महिन्याला सुमारे 1.5 कोटी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन लाभ घेत आहेत.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!