Friday, May 20, 2022

नगर ब्रेकिंग : संतापजनक:दिराच्या अत्याचाराला कंटाळून महिलेसह पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दीराकडून होणाऱ्या शारीरिक अत्याचाराला कंटाळून व पोलिसात तक्रार केल्यास कुटुंबियांना मारण्याची धमकी दिल्यामुळे पारनेर येथील पीडित

महिलेसह तिच्या पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना नगर शहरात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सप्टेंबर २०२१ ते ७ एप्रिल २०२२ या

काळात वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे व ७ एप्रिल रोजी पीडित दाम्पत्याने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. २० सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी पीडित महिला घरी एकटी

असताना तिच्या दीराने घराजवळील ओढ्यात नेवून बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर पीडित महिला ऑक्टोबरमध्ये घरी पायी जात असताना दीराने बळजबरीने गाडीत बसवून पळवे फाटा येथे एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला.

त्यानंतर वेळोवेळी शारिरिक संबंध ठेवले. फेब्रुवारी २०२२ मध्ये पीडित महिला घरी एकटी असताना दीर व त्याच्या पत्नीने मारहाण केली व सोन्याचे दागिने काढन घेऊन गेले. या त्रासाला कंटाळून पीडितेने सर्व प्रकार पतीला सांगितला. तिला घेऊन

तिचा पती दिराच्या घरी गेला. यावेळी तिघांनी शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दोघे पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास जात असताना रोडवर चारचाकी गाडी आडवी लावून दोघांनी त्यांना

घरी नेले व पोलिसात तक्रार दिली, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबास जिवे ठार मारु, अशी धमकी दिली. या प्रकाराला कंटाळून पीडित व तिच्या पतीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला व केडगाव येथे काही दिवस राहिले.

त्यानंतर माळीवाडा येथे एका लॉजवर जाऊन ७ एप्रिलला रात्री विषारी औषध घेतले, असे फिर्यादित म्हटले आहे. तपास सपोनि विवेक पवार हे करत आहेत.

ताज्या बातम्या

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...

नगर ब्रेकिंग:सोशल मीडियावर बनावट अकाऊंट: अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे.इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाऊंट तयार करून तसेच अश्लील मेसेज...
error: Content is protected !!