Wednesday, May 25, 2022

आमदार रोहित पवार यांना मंत्रिपदाची संधी द्या शरद पवारांना नगर जिल्ह्यातून मागणी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: सर्व महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांना आपण महा विकास आघाडी सरकारमध्ये मंत्री पदाची जबाबदारी द्यावी आणि त्यांना संपूर्ण

महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी द्यावी. अशी मागणी ओंकार गुंड अध्यक्ष अहमदनगर दक्षिण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारातर्फे आणि तमाम महाराष्ट्रातील युवकांच्या वातिने करण्यात आली आहे.

आमदार रोहितदादा पवार यांची आजच्या परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी ही अतिशय विस्तारित अशी आहे. तरुणांच्या बाबतीत शैक्षणिक, व्यावसायिक व आधुनिक शेतीच्या बाबतीत असलेला

दृष्टिकोन हा महाराष्ट्र राज्यासाठी फायदेशीर ठरेल. तरुण मंत्री म्हणून जबाबदारी जर मिळाली तर युवकांच्या रोजगाराच्या बाबतीत, व्यावसायिक उभारणीच्या बाबतीत पुढाकार घेऊन राज्यभरात जोमाने काम करता येईल.

त्यांचा राज्यभरातील युवकांशी असलेला संपर्क हा या उभारणीसाठी निश्चित पुढे घेऊन जाणारा असेल. कर्जत जामखेड विधानसभेचे प्रतिनिधित्व माननीय आमदार रोहितदादा पवार त्यांच्या कामाची पद्धत

हा उभा महाराष्ट्रच नव्हे तर त्यांच्या कामाची चर्चा ही संपूर्ण देशामध्ये आहे कर्जत-जामखेड सारख्या अति दुष्काळी भागामध्ये येऊन त्यांनी जो विकासाचा पॅटर्न राबवलेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय आहे.

आमदार रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघात निवडीपासून ते अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्याच्या केलेल्या कायापलट आतापर्यंतचा प्रवास हा कर्जत जामखेड मतदार संघातील मतदारच नाही

तर उभा महाराष्ट्र जाणतो. कर्जत-जामखेड सारखं महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी माननीय आमदार रोहित दादा पवार यांना आपण मंत्रीपदाची जबाबदारी टाकून त्यांना महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी द्यावी. महाराष्ट्र राज्याच्या

कानाकोपऱ्यात फिरलेले व इत्यंभूत माहिती असलेलेले तरुण नेतृत्व म्हणून रोहित दादांना ओळखले जाते. भौगोलिक परिस्थिती बद्दल माहिती असणारे व त्या ठिकाणच्या आर्थिक, कृषी व बाजारपेठ,दळणवळण, रोजगार, दुग्धव्यवसाय आशा विविध व सर्वांगीण दृष्टीने

अभ्यास असणाऱ्या आ.रोहित दादा पवार यांना जर मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली तर राज्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ते निश्चित प्रयत्नशील राहतील. अगदी कमी कालावधीमध्ये कर्जत-जामखेड करांचा विश्वास संपादन करून त्यांनी

त्यांच्यावरती लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवला आहे आणि एक हाती सत्ता हि नगर पंचायत मध्ये मिळवलेली आहे. हा त्यांच्यावर टाकलेला कर्जत करांचा विश्वासच आहे.आमदार रोहित दादा पवार यांचे आरोग्य,शिक्षण,क्रीडा, कला

या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तीर्ण काम आहे याची सुरुवात त्यांनी आपल्या स्वतःच्या मतदारसंघात पासून केले आहे आरोग्याची काळजी असेल कोरोनाच्या एक अतिशय कठीण प्रसंगांमध्ये परिस्थितीमध्ये त्यांनी जो काही

पॅटर्न उभा केला संपूर्ण महाराष्ट्राने त्याची दखल घेतली आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी जे काही आरोग्य शिबीर केले आहेत याची दखल संपूर्ण कर्जत करांनी जामखेडकर यांनी केलेली आहे. क्रीडा क्षेत्राच्या बाबतीमध्ये दादा अग्रगण्य

कामगिरी करत आहेत. सार्वजनिक क्षेत्रामध्ये दादांचा काम अ गणित आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कर्जत आणि जामखेड संपूर्ण शैक्षणिक शाळा डिजिटल करण्यात आलेले आहेत. कला-क्रीडा शिक्षण आणि सामाजिक आरोग्य या सर्व क्षेत्रांमध्ये दादांनी

आपल्या कामाचा ठसा उमटवून दाखवलेला आहे . आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे की आपण रोहित पवारांना महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 

 

 

 

ताज्या बातम्या

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...
error: Content is protected !!