नेवासा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली कोरोना काळात देखील नेवासा तालुक्यातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी आपण तालुक्यासाठी आणला. त्यांच्याच नेतृत्वाखाली नेवासा तालुक्यांचा सर्वांगीण विकास करणार असून पुढील काळातही तालुक्यातील पाणी योजनांसाठी मोठा निधी उपलब्ध करून संपूर्ण नेवासे तालुका टँकरमुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील विविध गावांतील पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री गडाख यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे पाठपुरावा करत तालुक्यातील वडुले, नांदूर शिकारी, सुकळी बुद्रुक व खुर्द, पाथरवाला, सुलतानपूर या गावांच्या पाणी योजनेसाठी जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत 30 कोटी रुपयांच्या योजनेस मंजुरी मिळवली.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील वडुले येथे पाचही लाभार्थी गावातील ग्रामस्थांच्या वतीने राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शनिवार दि.16 रोजी नागरी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. विशेषतः आपल्या डोक्यावरील पाण्याचे हांडे कायमस्वरूपी उतरणार असल्याने या कार्येक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्येक्रमास उपस्थित महिलांनी मंत्री गडाखांशी संवाद साधत त्यांचे आभार मानले.
यावेळी सरपंच दिनकर गर्जे, अशोक गर्जे, अरुण आतकरे, वल्लभ गर्जे, नांदूर शिकारीचे सरपंच केशरबाई सरोदे, संतोष लिपने, हरिभाऊ शिरसाठ, विलास लिपने, गोरक्षनाथ राजमाने, सरपंच शशिकला पवार,उपसरपंच बाळासाहेब म्हसरुप, गोरक्षनाथ साबळे, खंडेराव गुंड, भाऊसाहेब साबळे, सरपंच संगीता थोरे, हरिभाऊ थोरे, दत्तात्रय खाटीक, सरपंच अनिता शिंदे, भगवान पाटील, दिलीप कोठुळे, सोपान कोठुळे, शुभम देशमुख यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* गावांचा पाणीप्रश्न मिटणारी गावे व लोकसंख्या असे:–*
वडुले (१६१४), पाथरवाला (३१८७), सुलतानपूर (१८२२), नांदूर शिकारी (१५३४), सुकळी बुद्रूक (११८६) व सुकळी खुर्द (४९९) या सर्व सहा गावांची एकूण लोकसंख्या ९ हजार ८४३ आहे. या पाणी योजनेसाठी वरील सर्व गावांची सन २०५३ ची पुढील लोकसंख्या १६ हजार ग्रहीत धरून पाणी योजना साकारणार आहे.
*महिलांच्या डोक्यावरील हंडे उतरणार…*
मंत्री शंकरराव गडाख यांच्यामुळे वर्षानुवर्षे पाण्यासाठी आमच्या डोक्यावरचे हंडे आता उतरणार असल्याने अतिशय आनंद व समाधान होत आहे. नळपाणीपुरवठा होणार असल्याने गेल्या अनेक वर्षांची मागणी मंत्री गडाख यांच्या प्रयत्नातून साकारत आहे.
– केशरबाई सरोदे, सरपंच, नांदूर शिकारी, ता. नेवासा