Friday, May 20, 2022

अंडं शाकाहारी की मांसाहारी?अखेर मिळालं शास्त्रशुद्ध उत्तर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोंबडी आधी अंडं, या प्रश्नाचं नेमकं उत्तर अद्यापही सापडलेलं नाही. अंड्याशीच संबंधित आणखी एक गोंधळात टाकणारा प्रश्न म्हणजे अंडं व्हेज आहे की नॉनव्हेज? अंडं

खाणाऱ्या व्यक्ती याचा विचार करत नाहीत. काय म्हणावं अथवा म्हणू नये याच्याशी त्यांना काही देणंघेणं नसतं. परंतु, अनेक जणांना ते जाणून घेण्याची इच्छा शांत बसू देत नाही. त्यांचा शोध सुरूच असतो.

अंडं व्हेज की नॉनव्हेज याविषयी शास्त्रीय माहिती देणारं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने प्रसिद्ध केलं आहे.आपल्या आहारात भाज्या, कडधान्य, फळं यासोबत अंड्याचीही आवश्यकता असते. दररोज एक अंडं खाल्लं पाहिजे

असं तज्ज्ञ सांगतात. शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा अंड्यातून सहज मिळते. अंड्यातून प्रथिनं, लोह, आयोडिन, झिंक अशी आवश्यक पोषक तत्त्वंही मिळतात. त्यामुळे डॉक्टर अंडी खाण्याचा सल्ला देतात.

अंडं व्हेज की नॉनव्हेज, या प्रश्नावर अनेकांची वेगवेगळी उत्तरं तुम्ही ऐकली असतील; पण अंडं व्हेजही आहे आणि नॉनव्हेजही आहे. भागलपूरमधल्या प्रादेशिक पोल्ट्री फार्मच्या संचालिका

डॉ. अंजली यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. नर कोंबड्याच्या संपर्कात न येताही कोंबड्या अंडी देऊ शकतात. कोंबडीने कोंबड्याच्या संपर्कात न येता अंडं दिलं असेल, तर ते अंडं टेबल पर्पज किंवा शाकाहारी अंडं म्हणून ओळखलं जातं.

अंड्यातून पिल्लं बाहेर पडतात, म्हणून अंडं हे नॉनव्हेज आहे, असं बरेच जण मानतात. परंतु, बाजारात येणारी अंडी अनफर्टिलाइज्ड असतात. त्यातून कधीच पिल्लं बाहेर येऊ शकत नाहीत. अशी अंडी टेबल

पर्पजसाठीच जातात. कोंबडी सहा महिन्यांची झाल्यानंतर दररोज किंवा दीड दिवसाने एक अंडं देते. परंतु, त्यासाठी नर कोंबड्याशी संपर्कात येणं आवश्यक नसतं.अंडी देणं ही कोंबडीची नैसर्गिक प्रक्रिया असते.

कोंबड्यांच्या पिल्लांच्या उत्पादनासाठी इन्क्वेटर हॅचरीजचा वापर केला जातो. त्यासाठी दहा कोंबड्यांमध्ये एक कोंबडा सोडला जातो. त्या पिंजऱ्यात फर्टिलाइज अंडं असेल, तर त्यामधून कोंबडीचं पिल्लू

जन्म घेऊ शकतं. अशा अंड्याला नॉन-व्हेजिटेरियन अंडं म्हटलं जातं. म्हणजेच एखादी कोंबडी नर कोंबड्याच्या संपर्कात आल्यानंतर जे अंडं देते, ते फर्टिलायझेशनद्वारे दिलेलं असतं.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!