Wednesday, May 25, 2022

नगरच्या जिल्हाधिकारीविरोधात विधानसभेच्या आगामी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव मांडणार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विधानसभेच्या संविधानिक अधिकारप्राप्त विमुक्त जाती-भटक्या जमाती कल्याण समितीच्या बैठकीत खरी माहिती न देता दिशाभूल

केल्याचा ठपका ठेवत जिल्हा प्रशासनाचे प्रमुख या नात्याने नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याविरोधात विधानसभेच्या आगामी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव मांडला जाणार आहे.

समितीचे अध्यक्ष आमदार शांताराम मोरे यांनी शनिवारी ही माहिती दिली.विधानसभेची विमुक्त जाती-भटक्या जमाती कल्याण समिती गुरुवारी (दि. २१) तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी नगर

जिल्ह्यात आली होती. विधानसभा व विधान परिषदेच्या १५ आमदारांपैकी ८ आमदार या दौऱ्यात सहभागी झाले होते. समितीने दोन दिवस जामखेड, राहुरी, कर्जत, पारनेर या तालुक्यांना भेटी देऊन

विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर समितीने शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला समितीचे अध्यक्ष आमदार शांताराम मोरे, सदस्य रत्नाकर गुट्टे,

इंद्रनील नाईक, राजेश राठोड, गोपीचंद पडळकर, बळवंत वानखेडे तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी

उपस्थित होते. या बैठकीत अधिकाऱ्यांनी समाधानकारक माहिती न दिल्याने समितीच्या अध्यक्षांसह सहा आमदारांनी संतापून बैठकीवर बहिष्कार टाकला व तिथून निघून गेले.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!