Wednesday, May 25, 2022

खा विखे पाटीलांचा गंभीर आरोप म्हणाले त्यासाठी राष्ट्रवादीचा जन्म

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:श्रीरामपूरात एका खासगी कार्यक्रमाला खासदार डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद

साधताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. विखे पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच शिवसेना संपवण्यासासाठी झाला आहे. दोन वर्षांत शिवसेना

संपल्याशिवाय राहणार नाही, असे भाकीत वर्तवून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नादी लागू नये. जेवढे लवकर होईल तेवढे बाजूला व्हावे, असा सल्ला खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, की एकीकडे सर्वसामान्य शिवसैनिक, खासदार शिवसेनेसाठी रस्त्यावर उतरले होते, तर दुसरीकडे राष्ट्रवादी कोल्हापुरात संकल्प सभा घेतली. ह्या सभेत शरद पवार यांनी

मुख्यमंत्र्यांच्या कामाचा आणि शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नाही. स्व. बाळासाहेब विखेंपासून शिवसेनेशी आमचे संबंध आहेत. शिवसेनेबद्दल विखे परिवाराला कायमच आदर राहील.

राणा, संजय राऊत, किरीट सोमय्या यांच्या पलीकडे राज्यसरकारने बोलावे. दूध, कांदा, शेतकरी, वीज प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी व सरकारने भूमिका घ्यावी.काही मंडळी सकाळी आम्हाला आणि रात्री

संगमनेरला भेटतात. इकडे गोड बोलतात आणि संस्था बंद करण्यासाठी मंत्रालयात भेटी घेतात, असा टोला कोणाचे नाव न घेता लगावला. 40 आमदारांचे महसूलमंत्री होतात. ज्यांच्यावर

जिल्ह्याची जबाबदारी दिली त्यांनी एकतरी शिवसेना आमदार निवडून आणून दाखवा, असे आवाहन करताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव घेण्याचे टाळले.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!