Wednesday, May 25, 2022

गुगलपाठोपाठ ट्रु कॉलरचा मोठा निर्णय, 11 मेपासून 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गुगलपाठोपाठ ट्रु कॉलरने येत्या 11 मेपासून कॉल रेकॉर्डिंग सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच गुगलने प्ले स्टोअर पॉलिसी अपडेट केली आहे.

येत्या 11 मे पासून ही नवीन पॉलिसी लागू केली जाणार आहे. यामुळे थर्ड पार्टी ऍप्सना कॉल रेकॉर्डिंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे नाइलाजास्तक ट्रु कॉलरनेदेखील कॉल रेकॉर्डिंगचे फीचर हटवण्याची घोषणा केली आहे.

अँड्रॉइड अथॉरिटीच्या एका रिपोर्टनुसार, गुगलने आपल्या डेव्हलपर पॉलिसीमध्ये अनेक बदल केले आहेत. ज्याच्यामुळे इतर सर्व थर्ड पार्टी ॲप्स डिलिट होणार आहेत.

दरम्यान, असे असले तरी सध्याच्या कॉल रिकॉर्डिंगच्या सुविधांवर याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ज्या कॉल रेकॉर्डिंग सुविधा

मोबाईलमध्ये इनबिल्ड आहेत, त्याच्यावर या निर्णयाचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. गुगलकडून सांगण्यात आल्यानुसार, नवीन पॉलिसीमुळे एक्सेसिबिलिटी एपीआय

डिझाईन केली गेलेली नाही व त्यामुळे रिमोट कॉल ऑडिओ रेकॉर्डिंग केली जाउ शकत नाही.आपल्या नवीन पॉलिसी अंतर्गत विविध अँड्रॉइड व्हर्जनमध्ये कॉल रेकाँर्डिंग करणार्या एपीआयला गुगलकडून

हटविण्यात येणार आहे. विविध देशांमध्ये कॉल रेकॉर्डिंगबाबत वेगवेगळे नियम लावण्यात आले असल्याने गुगलकडून हा निर्णय गुप्ततेच्या धोरणाला अनुसरुन घेण्यात आला आहे. गुगलने अँड्रॉइड 10 ला ब्लॉकदेखील केले आहे.

गुगलने जरी प्ले स्टोअरमधून व्हाईस रेकॉर्डिंग ॲप्स काढले असले तरी, काही कंपन्या बाय डिफॉल्ट आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगचा पर्याय उपलब्ध करुन देत असतात. गुगल

पिक्सल, सॅमसंग आणि शाओमी सारख्या कंपन्या आपल्या मोबाईलवर पहिल्यापासून इनबिल्ड रेकॉर्डिंगचे फिचर्स देत असतात. त्यामुळे गुगलच्या या निर्णयाच्या अशा मोबाईल्सवर कुठलाही फरक पडणार नाही.

आणि तुम्ही पूर्वीप्रमाणे कॉल रेकॉर्डिंग करु शकाल.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!