Wednesday, May 25, 2022

लग्नात आलेल्या पाहुण्यांसोबत नवरीचं धक्कादायक कृत्य

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लग्न हा असा प्रसंग असतो ज्यात लोक भरपूर मजा मस्ती करतात. या दरम्यान नवरी आणि नवरदेव दोघांकडूनही भरपूर धम्माल केली जाते. आपलं लग्न अविस्मरणीय

व्हावं ही प्रत्येक वधू-वरांची इच्छा असते. घरी आलेले पाहुणे खूप आनंद राहातात आणि सर्वजण आनंदाने निघून जातात. पण फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या एका महिलेनं आपलं लग्न संस्मरणीय

बनवण्यासाठी जे केलं ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या लग्नाला आलेले पाहुणे कंटाळू नयेत म्हणून तिने सगळ्यांच्या जेवणात भांग मिसळली.नवरी डॅन्या ग्लेनी आणि तिच्या लग्नात जेवणाची

व्यवस्था करणाऱ्या जोसेलिन ब्रायंटला पोलिसांनी अटक केली आहे. 19 फेब्रुवारीला डॅन्याचं लग्न झालं मात्र याच आठवड्यात तिला आणि तिच्या केटररला अटक करण्यात आली . एनबीसी न्यूजनुसार,

त्यांच्यावर लोकांना न कळवता त्यांच्या जेवणात भांग मिसळल्याचा आरोप आहे. लग्नाला आलेल्या पाहुण्यांना जेवणात भांग मिसळल्याची माहिती नव्हती, असं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे हे अन्न खाल्ल्यानंतर अनेकजण आजारी पडले.

सेमिनोल काउंटी शेरीफच्या ऑफिसने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की लग्नाला अनेक पाहुणे आले होते. यापैकी सुमारे 50 जणांनी अन्न खाल्ल्यानंतर तब्येत बिघडल्याच्या तक्रारी केल्या.

जेवण मीटबॉल्स, सीझर सॅलड, ऑलिव्ह ऑइलसह ब्रेड आणि हर्ब डीपसोबत दिलं गेलं होतं. अनेक पाहुण्यांची जेवण खाल्ल्यानंतर पोटात दुखू लागल्याने उलट्या होऊ लागल्याची तक्रार होती.

या लग्नाला आलेल्या मिरांडा काडी या पाहुणीने सांगितलं की, जेवण खाताच तिला हृदयविकाराचा झटका आल्यासारखं वाटू लागलं. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते आणि घरी जाण्यापूर्वी तिला गाडीतच झोप आली.

गुप्तहेरांनी लग्नाच्या जेवणाची चाचणी केली असता त्यात गांजा मिसळल्याचं आढळलं. आता दोन महिन्यांनंतर पोलिसांनी वधू आणि तिच्या केटररला अटक केली आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!