माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरातील धरमपेठ परिसरात असलेल्या ग्लो स्पा अँड सलूनमध्ये काही महिलांकडून देह व्यापार करून घेतला जात असल्याचा माहिती पोलिसांनी मिळाली होती.
त्या ठिकाणी धाड टाकली असता त्यातून दोन महिलांची सुटका केली तर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागपूरमधील धरमपेठ हा परिसर उच्चभ्रु लोकांचा परिसर म्हणून ओळखला जातो.
मात्र या परिसरात ग्लो स्पामध्ये काही युवती आणि महिलांकडून पैशाचं आमिष दाखवून देहव्यापर केला जात असल्याची माहिती सीताबर्डी पोलीसना मिळाली होती.त्यावरून पोलिसांनी त्या
ठिकाणची आधी पाहणी केली आणि नंतर त्या ठिकाणी धाड टाकत कारवाई केली यावेळी दोन महिला त्या ठिकाणी देह व्यापार करत असल्याचं दिसून आलं पोलिसांनीत्यांची सुटका करत मुख्य आरोपीला अटक केली.
पोलिसांनी आता तपास सुरू करत या ठिकाणी हा व्यवसाय किती दिवसांपासून सुरु होता आणि यात आणखी कोण कोण गुंतल आहे याचा शोध सुरू केला आहे.