Wednesday, May 25, 2022

सोनं झालं स्वस्त तर चांदी महागली; जाणून घ्या आजचा दर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. यातच सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सराफा बाजारात सोने स्वस्त झाले आहे. मात्र, चांदीचे दर वाढले आहेत.

सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 226 रुपयांनी स्वस्त होऊन 51851 रुपयांवर आला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात 344 रुपयांची वाढ झाली असून, चांदीचा

दर 65510 रुपये किलोवर पोहोचला आहे. सोन्याचा दर ऑल टाईम हाय 56254 रुपयांवरून, 4275 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे. तर, चांदी दोनवर्षांपूर्वीच्या आपल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत प्रती किलो 10490 रुपयांनी स्वस्त आहे.

इंडिया बुलियन्स असोसिएशनने जारी केलेल्या स्पॉट रेटनुसार आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 3 टक्के जीएसटीसह 53406 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे. तर, जीएसटीसह चांदीचा दर 67475 रुपये प्रती किलो असा आहे.

जीएसटीसह 18 कॅरेट सोन्याचा दर – 18 कॅरेट सोन्याचा दर आता 3888 रुपये एवढा आहे. 3 टक्के GST सह, तो 40054 रुपये प्रती 10 ग्रॅम असेल. याशिवाय, 14 कॅरेट सोन्याचा दर 30,333 रुपये प्रति 10 ग्रॅम असून. GST सह, ते 31242 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल.

23 कॅरेट सोन्याचा दर – 23 कॅरेट सोन्याचा विचार करता, आज बाजारात हे प्रति 10 ग्रॅम 51643 रुपये दराने खुले झाले. यावरही 3 टक्के जीएसटी स्वतंत्रपणे आकारला जाईल म्हणजेच आपल्याला हे प्रति 10 ग्रॅम 53192 रुपयांना मिळेल.

याच बरोबर दागिने बनवण्याची मजुरी आणि ज्वेलर्सचा नफा वेगळा आसेल. याच वेळी, 22 कॅरेट सोन्याचा दर 47496 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खुला झाला. 3टक्के GST सह, याची किंमत 48920 रुपये असेल.

याच बरोबर दागिने बनवण्याची मजुरी आणि ज्वेलर्सचा नफा वेगळा आसेल.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!