Wednesday, May 25, 2022

कॉल रेकॉर्डिंग करताय तर हे वाचाच

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कधी एखादा महत्त्वाचा फोन आला असेल आणि आपण घाईत असू तर आपण तो कॉल रेकॉर्ड करून घेतो. याशिवाय अनेकांना कॉल रेकॉर्ड करण्याची सवय असते.

फोनवर कॉल रेकॉर्डिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कॉल रेकॉर्डिंगमुळे अँड्रॉइड फोनवरील सुरक्षा आणि गोपनीयतेच्या निर्माण झालेल्या समस्यांमुळे गुगलने मोठी पावलं उचलली आहेत.

अँड्रॉइड स्मार्टफोन्सवरील थर्ड-पार्टी कॉल रेकॉर्डिंग अ‍ॅप्ससाठीचं गुगलचं नवीन धोरण कडक केलं जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 11 मे पासून थर्ड पार्टी अ‍ॅप्स कॉल रेकॉर्डिंग सुविधा देऊ शकणार नाहीत.

Google च्या नवीन पॉलिसीनुसार, अ‍ॅप्सना प्ले स्टोअरवर कॉल रेकॉर्डिंगसाठी Accessibility API वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. पॉलिसी लागू झाल्यानंतर Truecaller वरील फ्री

कॉल रेकॉर्डिंग हे फीचर काढून टाकलं जाईल. हे फीचर पूर्णपणे काढून टाकण्यात आलेलं नाही; पण हे फीचर 11 मे रोजी हटवलं जाईल, असं Truecaller चं म्हणणं आहे. Digit.in ने या संदर्भात वृत्त दिलंय.

Google ने Android 10 आणि Android 6.0 मध्ये कॉल रेकॉर्डिंग API बंद केलं आहे तेव्हापासून, डेव्हलपर मायक्रोफोनवर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी अ‍ॅक्सेसिबिलिटी API वापरत आहेत.

नवीन Play Store धोरण अपडेट आता थर्ड पार्टी अ‍ॅप्सनी रिमोट कॉल रेकॉर्डिंगसाठी अ‍ॅक्सेसिबिलिटी API ची केलेल्या रिक्वेस्टला परवानगी देणार नाही. हा बदल 11 मे 2022 पासून लागू होईल.

तसंच हा बदल थर्ड-पार्टी अ‍ॅप्सना आपोआप लागू होईल आणि फोनमध्ये उपस्थित असलेल्या प्री-लोडेड अ‍ॅप्सवर परिणाम होणार नाही, असं Google ने स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!