माय महाराष्ट्र न्यूज:पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे.
महाविद्यालयातील शिपायाने एका विद्यार्थीनीकडे विचित्र मागणी केली आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.12 वी पास व्हायचं का? असं
विचारत एका विद्यार्थीनीकडे महाविद्यायातील शिपायाने विचित्र मागणी केली. या प्रकरणी पीडित मुलीने तक्रार दाखल केल्यावर आरोपी शिपायाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
पिंपरी चिंचवडमधील नावाजलेल्या महाविद्यालयात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने फ्लाईंग वूमन फाऊंडेशनकडे तक्रार केली. त्यानंतर ही तक्रार पोलिसांकडे गेली आणि मग
पोलिसांनी आरोपी शिपायाला अटक केली. मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आरोपीने आणखी कुठल्या विद्यार्थीनींच शोषण केलं का? याचा शोध घेण्याची मागणी केली जात आहे.
आरोपी विनोद याने पीडित विद्यार्थीनीला फोन केला. यावेळी त्याने त्या मुलीला म्हटलं, 12वी पास व्हयचं आहे ना? त्यावर पीडित मुलगी हो म्हणाली. त्यावर आरोपीने मुलीला म्हटलं, तुझी एक फ्रेंड
असल तर तिला विचार अंकल ला काय दिला का नाही ते ? मला तू पाहिजे, तू. या घटनेनंतर पीडित मुलीने न घाबरता याबाबत तक्रार केली आणि आरोपी गजाआड झाला.