माय महाराष्ट्र न्यूज:प्रत्येक महिन्यात काहीतरी बदल होत असतातच. एरवी प्रत्येक महिन्याची सुरुवात पगारासह आनंद आणते. पण फक्त आनंददायकच गोष्टी घडतील असे अजिबात आवश्यक नाही.
अनेकदा महिन्याच्या सुरुवातीला काही वस्तूंच्या किंमती वाढतात. अशा स्थितीत एक दिवसानंतर एप्रिल महिना संपत असून मे महिना सुरू होणार आहे. या महिन्याची सुरुवातही अनेक मोठ्या
बदलांसह होणार आहे. अशा परिस्थितीत हा महिना तुमच्यासाठी कोणत्या प्रकारची सुरुवात घेऊन येणार आहे ते जाणून घ्या. या महिन्याच्या सुरुवातीलाही एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीबाबत
कंपन्या निर्णय घेऊ शकतात. व्यावसायिक आणि घरगुती गॅसच्या किंमतीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वेळी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ
करण्यात आली होती. महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या बजेटवर गॅस सिलिंडरच्या किंमतींचा थेट परिणाम होत असतो. बाजारातदेखील खाद्यपदार्थ यामुळे महाग होत असतात.
बॅंकिंग हा प्रत्येकाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असतो. बॅंकांच्या सुट्ट्यांवर त्यामुळे सर्वांचेच लक्ष असते.जर तुमच्या बँकांमध्ये वारंवार फेऱ्या होत असतील
तर मे महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी वाईट असू शकते. 1 मे ते 4 मे पर्यंत सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र, या सुट्या वेगवेगळ्या राज्यानुसार असतील. देशात मे महिन्याच्या
सुरुवातीलाच ईद साजरी केली जाईल. याशिवाय मे महिन्यात शनिवार आणि रविवारसह 11 दिवस बँका बंद राहतील.1 मे पासून होणार्या इतर मोठ्या बदलांपैकी एक म्हणजे किरकोळ
गुंतवणूकदारांसाठी UPI पेमेंटची मर्यादा वाढवली जाईल. सेबीच्या नवीन नियमांनुसार, 1 मे नंतर एखाद्या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुम्ही UPI द्वारे पेमेंट करताना 5 लाख
रुपयांपर्यंतची बोली सबमिट करू शकता. सध्या ही मर्यादा दोन लाख रुपये आहे. नवीन मर्यादा 1 मे नंतर येणाऱ्या सर्व IPO साठी वैध असेल. पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांच्या दरात होत
असलेल्या वाढीचा मोठा फटका सर्वांना बसतो आहे. आधीच असलेल्या महागाईत त्यामुळे आणखी वाढ होते आहे. त्यामुळे मे महिन्यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे
दर आणखी कोणती पातळी गाठणार याकडे लोकांचे डोळे लागलेले आहेत.